Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब!

 अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब!

मुंबई : एकीकडे राज्यसभेच्या तिसऱ्या उमेदवाराचा घाट घातला जात असतानाच आज पहाटे महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री आणि मातोश्रीचे निकटवर्तीय असलेल्या अनिल परब यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणी एकाच वेळी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या. आज सकाळपासून महाराष्ट्रात ही खळबळ सुरू असतानाच एका व्यक्तीकडे सध्या सर्वांचीच नजर आहे. ती म्हणजे सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाचे सहायक संचालक तासिन सुलतान! अनिल देशमुख यांची चौकशी करून त्यांना कोठडीत धाडणारे सुलतान आता अनिल परब यांची चौकशी करत आहेत.

शिवसेनेचे नेते या चौकशीला राज्यसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी दाखवत आहेत, मात्र दुसरीकडे ईडीकडून एकाच वेळी अनिल परब यांनी जमिनीचे व्यवहार केलेल्या विभास साठे यांच्या घरावर देखील ईडी अधिकारी चौकशी करत आहेत. परब यांच्या अजिंक्यतारा या निवासस्थानी देखील धाड टाकली आहे, तर परब यांच्या मातोश्री नजिकच्या इमारतीवरही सध्या अधिकारी ठाण मांडून आहेत. परब यांचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रिंगची संदर्भात संबंधित असल्याचा ईडीला संशय आहे. मागील वर्षापासून सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय हे अनिल परब यांच्या व्यवहारावर नजर ठेवून आहे. आज सकाळपासून ईडीचे सहाय्यक संचालक तासिन सुलतान हे खुद्द अनिल परब यांची चौकशी करत आहेत.

अनिल देशमुख यांची देखील चौकशी तासिन सुलतान यांनीच केली होती, तर आता अनिल परब यांची देखील चौकशी तासिन सुलतान हेच करत आहेत. त्यामुळे सध्या राज्यात तासिन सुलतान यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. काही वर्षांपूर्वी एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून अधिकाऱ्यांशी चर्चा व्हायची आता राजकीय नेत्यांची चौकशी करणारे ईडीचे अधिकारी जास्त चर्चेत आहेत. अनिल परब यांच्या चौकशीमागे अनिल देशमुख यांच्या कथित शंभर कोटी वसुलीचे कनेक्शन असल्याचे बोलले जाते. अनिल देशमुख यांच्या प्रकरणातील सचिन वाजे याने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला असून याच प्रकरणात त्याने अनिल परब यांचे देखील नाव घेतले आहे. त्यामुळे अनिल परब यांनी पोलिसांच्या बदल्यामध्ये पैसे घेतल्याचा ईडीला संशय आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.