स्पर्धा परीक्षा विजेते प्रमोद चौगुले यांचा पृथ्वीराज पाटील यांच्याकडून गौरव
सांगली, दि. २: सोनी गावचे सुपुत्र प्रमोद चौगुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याबद्दल काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री. पाटील यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला यावेळी ते म्हणाले, प्रमोद चौगुले यांनी अत्यंत कष्टातून हे यश मिळवले आहे. या यशाचा उपयोग त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी करावा अशा शुभेच्छा त्यांना दिल्या. यावेळी बिपीन कदम, रवी खराडे, विजय आवळे, प्रशांत देशमुख शीतल सदलगे, अरविंद पाटील, अप्पासाहेब पाटील, रवींद्र वळवडे, बाबगोंडा पाटील व चेतन पाटील समडोळी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.