Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही विशेष आहे त्यांच्याही ईर्षा न करता,ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही कमी आहे त्यांचा अवमान न करता आणि जे आपल्याशी समान आहेत त्यांच्याशी स्पर्धा न करता श्रेष्ठत्वाकडे जाता येते.

ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही विशेष आहे त्यांच्याही ईर्षा न करता,ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा काही कमी आहे त्यांचा अवमान न करता आणि जे आपल्याशी समान आहेत त्यांच्याशी स्पर्धा न करता श्रेष्ठत्वाकडे जाता येते.


दुःखावर मात करणे हे तथागतांचे आयुष्यभराचे उद्दिष्ट होते.माणसांच्या परस्परसंबंधातील संतुलन बिघडणे,हे मानवी दुःखाचे एक फार महत्त्वाचे कारण असते.सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, सौंदर्य इ.बाबतीत आपल्यापेक्षा सरस असलेल्या लोकांविषयी मत्सर बाळगणे,त्यांचा द्वेष करणे,त्यांची बदनामी करणे आणि त्याद्वारे स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे,अशी कोती वृत्ती काही जणांकडे असते. काही जण आपल्यापेक्षा दुबळ्या लोकांना चिरडण्याचा ,दडपून टाकण्याचा,गुलाम बनविण्याचा प्रयत्न करतात आणि यामार्गे स्वतःचा वरचढपणा सिद्ध करू पाहतात. आपल्या बरोबरच्या माणसांबरोबर स्पर्धा करून त्यांच्यावर मात करण्याच्या प्रयत्नात माणसे नाना प्रकारचे ताण निर्माण करतात.या प्रकारात इतरांनाही पीडा दिली जाते आणि स्वतःलाही क्लेश होतात. याउलट, जो सर्व माणसांना समान मानतो,दुसऱ्याला अथवा स्वतःलाही श्रेष्ठ समजत नाही आणि हीनही मानत नाही,एका उमद्या शैलीने जीवन जगतो,तो आपल्या त्या उमदेपणामुळेच आपोआप श्रेष्ठ बनतो.तो स्वतः प्रसन्नपणाने जगतो आणि इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करतो.बुद्धत्वप्राप्तीनंतर मनुष्य अशा उंचीवर जातो.

#सर्वोत्तम भूमिपुत्र: गोतम बुद्ध

      लेखक- डॉ.आ.ह.साळुंखे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.