...तर महापालिकेवर गुन्हा दाखल करू मोकाट घोड्याच्या धडकेत वृद्धेसह मुलगी जखमी
सांगली सर्किट हाऊस परिसरात फिरणाऱ्या मोकाट घोड्यांनी एका मुलीला व वृद्ध महिलेला उडवले व चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या. याबाबत स्थानिक नगरसेवकांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले असून आयुक्तांना पत्र देऊन महापालिकेवर गुन्हा दाखल करणार असल्याचे मालू यांनी सांगितले .
माधवनगर रस्त्यावरील सर्किटाऊस, आप्पासाहेब पाटील नगर परिसरात पाच ते सहा घोडे व खेचर यांनी अक्षरश उच्छाद मांडला आहे. परिसरात महापालिकेचे आयुक्त चा बंगला आहे पण तो बंदिस्त आहे. सकाळी व्यायामासाठी जाणारे व संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
घोडे जोरात पळत येऊन लहान मुले व वृद्धांना जोरात धडक देतात व त्यानंतर चावा घेवुन पळ काढतात . असाच प्रकार रविवारी घडला सौ.तारा मालू (वय 70) फिरावयास जात असताना घोड्याने जोरात धडक दिली व पडल्या नंतर त्यांना चावा घेऊन घोडे पसार झाले. तर आप्पासाहेब पाटील नगर मधील एका अठरा वर्षाच्या मुलीला ही जोरात धडक देऊन खाली पाडले व चावा घेऊन घोडे पळून गेले.
या परिसरात सर्किट हाऊस, मल्टिप्लेक्स, अनेक दवाखाने, आयुक्त बंगला असून ही अशा मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. त्यावर स्थानिक नगरसेवक मुळके, निंबाळकर, ठोकळे, कुरणे यांना सांगून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या तुन संताप व्यक्त होत आहे.
याबाबत घोड्यांचा व जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करा असे आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असून जखमी नागरिक महापालिकेवर गुन्हा दाखल करणार असल्याचे मालू यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.