Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

त्या सदुनिवर कारवाई अटळ

त्या सदुनिवर कारवाई अटळ


त्याच्या कारनाम्याचा अहवाल लवकरच वरीष्ठांना सादर होण्याची शक्यता

सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिवर आता कारवाई अटळ असल्याची चर्चा एक्साईजमध्ये आहे. इस्लामपूर प्रकरणात त्याने केलेल्या कारनाम्याचा अहवाल लवकरच सादर होण्याची शक्यता वतर्वली जात आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कारवाई होते याकडे सवार्चे लक्ष लागून राहिले आहे.    

इस्लामपूर येथे गेल्या महिन्यात गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर पकडण्यात आला होता. येलूर येथील एका बार चालकाला हाताशी धरून त्या सदुनिने कारवाईचा फासर् घडवून आणला होता. यामध्ये एकाला विनाकारण गोवण्यात आले होते. त्याबाबत त्या संशयिताने वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. संशयिताच्या चारचाकी गाडीतही दारू सापडल्याचा त्या सदुनिचा बनाव फसला होता. ही कारवाई करताना त्याने झिरोंचा वापर केला होता. शिवाय त्यान त्याच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावून कारवाई केल्याचाही आरोप संशयिताने केला होता. या कारवाईवेळी त्याने उंची दारूचे बॅक्स त्याच्या गाडीत ठेवल्याचाही आरोपही त्या सदुनिवर करण्यात आला होता. 

त्याच्या या कारनाम्याचा सांगली दपर्ण ने पदार्फाश केल्यानंतर त्याला नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणातील सवार्चे जबाबही नोंदवून घेण्यात आले आहेत. या प्रकरणाचा संपूर्ण गोपनीय अहवाल लवकरच वरीष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या सदुनिवर कडक कारवाई अटळ असल्याची चर्चा एक्साईजमध्ये आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.