Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज सांगलीत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आज सांगलीत 



सांगली, दि. ८ :  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले हे उद्या रविवार दि. ८ मे, २०२२ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

ते म्हणाले, श्री. पटोले हे उद्या दुपारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 2.00 वाजता त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शास्त्री चौक येथे आगमन होईल. त्यानंतर ते राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार समारंभास उपस्थित राहणार आहेत. राजर्षी शाहू शिक्षण संस्था, इनाम धामणी यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, विश्रामबाग येथे होणार आहे.

दुपारी ४ ते ५ या वळेत ते काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.