Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोव्हिडं मधील एकल विधवा महिला आणि अनाथ बालकांना महापालिका देणार दरमहा एक हजार उदरनिर्वाह भत्ता प्रस्ताव महासभेसमोर सादर

कोव्हिडं मधील एकल विधवा महिला आणि अनाथ बालकांना महापालिका देणार दरमहा एक हजार उदरनिर्वाह भत्ता प्रस्ताव महासभेसमोर सादर 


मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती


सांगली : कोव्हिडं काळामध्ये कोव्हिडंमुळे पतीच्या निधनाने एकल झालेल्या विधवा महिला आणि अनाथ झालेल्या बालकांना महापालिकेकडून दरमहा एक हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता  देण्याबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेसमोर सादर केला आहे अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

    कोव्हीड काळात पतीच्या निधनाने एकल बनलेल्या महिला 98 आहेत तर अनाथ बालके 10 आहेत. अशा एकूण 108 जणांना शासनाच्या निर्देशानुसार दरमहा एक हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता महापालिकेकडून दिला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येणाऱ्या महासभेसमोर सादर करण्यात आला असून महासभेच्या मंजुरीनंतर एकल विधवा महिला आणि अनाथ बालकांना प्रतिमहा एक हजार रुपये उदरनिर्वाह भत्ता सुरू केला जाणार असल्याचेही आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.