Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्नाटकात मुसळधार पावसामुळे हाहाकार, आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू, सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश

कर्नाटकात मुसळधार पावसामुळे हाहाकार, आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू, सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश


बेंगळुरू : कर्नाटकात मुसळधार पावसाने कहर सुरूच आहे. या जीवघेण्या पावसात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. हुबळीसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी साचल्याने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

एनडीआरएफच्या चार तुकड्या मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सगळ्याच्या दरम्यान मुख्यमंत्री बसवराज एस बोम्मई यांनी बंगळुरूमधील अनेक पाणी साचलेल्या भागांना भेट दिली.

शेकडो एकर पिके उद्ध्वस्त, 23 घरांचे पूर्ण नुकसान

या पावसामुळे 204 हेक्टर शेती आणि 431 हेक्टर बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. 23 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. माहिती देताना महसूल मंत्री आर अशोक म्हणाले की, चिकमंगळूर, दक्षिण कन्नड, उडुपी, कोडागु, शिवमोग्गा, दावणगेरे, हसन आणि उत्तरा कन्नड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.