Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वशिल्याने भरती झालेल्या सदुनिची धावपळ वाढली

वशिल्याने भरती झालेल्या सदुनिची धावपळ वाढली



सांगली: इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला तो सदुनि वशिल्याने खात्यात भरती झाल्याची चर्चा आहे. तत्कालीन अधीक्षकांना मॅनेज करून पात्रता नसताना त्याची भरती केल्याची चचार्ही एक्साईजमध्ये आहे. दरम्यान इस्लामपूर परिसरात सुरु असलेल्या अवैध दारू विक्रीला या सदुनिचा छुपा पाठिंबा असल्याचे याच व्यवसायातील लोकांचे म्हणणे आहे.  

येलूर फाट्यावर सापडलेल्या गोवा बनावटीच्या दारू प्रकरणात हा सदुनिच मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. ते प्रकरण दपडण्यासाठी त्याने संशयित आणि तिच्या पत्नीवर चांगलाच दबाव टाकला आहे. सांगलीतील वरीष्ठ त्याला या प्रकरणात वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने कोल्हापूरमधील अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची चौकशी करून सविस्तर अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. तरीही सांगलीतील अधिकाऱ्यांनी संशयितासह त्याच्या पत्नीचा इन कॅमेरा जबाब घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय संबंधित सदुनिलाही नोटीस काढण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान या सदुनिला वाचवण्यासाठी याच खात्यात अधिकारी असणाऱ्या त्याच्या वडिलांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. त्यामुळे कोणी, कितीही चौकशी केली तरी माझ कोणीही वाईट करू शकत नाही अशा बढाया मारत हा सदुनि सध्या फिरत आहे. यापूवीर्च्या अनेक वादग्रस्त प्रकरणातून सहीसलामत बाहेर पडल्याने इस्लामपूर प्रकरणातही आपल्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचा अति आत्मविश्वास त्याला असल्याचे एक्साईजमध्येच बोलले जात आहे. या सदुनिच्या भरतीचीही सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.