Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एनजीओ , स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींनी उपस्थित राहावे : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन

एनजीओ , स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींनी उपस्थित राहावे : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन


आपत्तीपूर्व तयारीसाठी सोमवारी महापालिकेत एनजीओ, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींची नियोजन बैठक : महापौर, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार बैठक : एनजीओ , स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींनी उपस्थित राहावे : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन

सांगली  : संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक 23 मे रोजी आपत्तीपूर्व तयारीसाठी महापालिकेत एनजीओ, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.  महापौर दिग्विजय सुर्यवंशी आणि मनपाचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

        संभाव्य पावसाळा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या  आपत्तीच्या पार्श्वभूमीवर आणि मागील महापुराच्या आपत्तीमध्ये अनेक एनजीओ आणि संस्थांनी तसेच समाज सेवकांनी त्याकाळात महापालिकेला दिलेले योगदान आणि जनतेला केलेली लक्षात घेता यंदाच्या संभाव्य पुराच्या आपत्तीची पूर्व तयारी म्हणून मनपाक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व

स्वयंसेवीसंस्था, सामाजिक संघटना, सामाजिक संस्था यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आपत्तीपुर्व तयारी बैठक आयोजित केली आहे. सोमवारी सायंकाळी 5 वाजता महापालिकेच्या डॉ. वसंतदादा पाटील सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महापालिकेचे पदाधिकारी यांचेसह महापालिकेच्या आपत्ती नियोजन विभागासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सर्व संस्थांच्या प्रतिनिधींनी तसेच सामाजिक कार्यकर्ते, खासगी बोट धारक, वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था , व्यक्ती तसेच रेस्क्यू आणि मदत करणाऱ्या संस्था संघटना यांनी सहभागी होऊन संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाला आपल्या सूचना द्याव्यात असे आवाहनही मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.