Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजपासून रोख पैसे काढण्याबरोबरच ठेवींसाठी पॅन, आधारची आवश्यकता

 आजपासून रोख पैसे काढण्याबरोबरच ठेवींसाठी पॅन, आधारची आवश्यकता


भारतात बँकांतून रोख पैसे काढणे आणि जमा करण्यासाठी असलेल्या सिस्टम आजपासून म्हणजे 26 मेपासून बदलणाआहे. केंद्राने आता नागरिकांना बँक, पोस्टातून पैसे काढण्यासाठी किंमा जमा करण्यासाठी पॅन (कायमचा खाते क्रमांक) किंवा आधार कार्ड नमूद करणे सक्तीचे केले आहे.

यामुळे एका आर्थिक वर्षात सहकारी बँका आणि पोस्ट ऑफिससह बँक खात्यांमधून 20 लाखांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ग्राहकांना आधार आणि पॅन नंबर द्यावा लागणार आहे. हा नियम चालू खाते उघडण्यासाठी देखील लागू होईल. अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मे महिन्यात जारी केलेल्या एका अधिसूचनेत दिली आहे. 

त्यामुळे आता प्रत्येक ग्राहकाला

बँक , पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बँकांमध्ये व्यवहार करण्यासाठी पॅन, आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक गरजेचा असणार आहे. तसेच बँक अधिकाऱ्यांनाही पैसे जमा करणाऱ्या किंवा काढणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड, पॅन कार्ड आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी लागणार आहे.

यापूर्वी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड फक्त एक दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी लागू होता. परंतु नियम 114 बी नुसार रोख ठेव किंवा काढण्यासाठी कोणतीही वार्षिक मर्यादा समाविष्ट नव्हती. याशिवाय ही मर्यादा फक्त बँकेत ठेवलेल्या ठेवीवर लागू होती. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रोकड इकडून तिकडे फिरु लागली. त्यामुळे सरकारने हा नवा नियम लागू केला आहे.  रोख व्यवहारात पारदर्शकता यावी या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. हा नियम फक्त बँक किंवा पोस्ट ऑफिससाठीच नाही तर सहकारी संस्थांना देखील लागू असेल, त्यामुळे बँक, सहकारी बँकास पोस्ट ऑफिसमधून 20 लाखांपेक्षा अधिकचे व्यवहर करताना तुमहाला पॅन क्रमांक, आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. त्यासोबत नवीन अकाऊंट ओपन करण्यासाठीही आधार, पॅन कार्डची गरज लागणार आहे.

बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना झटका, बचत खात्यावरील व्याजदरात कपात

वार्षिक स्टेटमेंट (AIS) आणि TDS च्या कलम 194N द्वारे सरकारद्वारे याबाबत अनेक निर्णय घेतले जात आहे. पण आता रोखीचे व्यवहार अगदी सहज शोधता यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. छोट्या व्यवहारातून होणारी करचोरी नोटाबंदीनंतरही मोठ्याप्रमाणात सुरु होती. मात्र याचा शोध घेणे सरकारसाठी मोठे आव्हान होते. मात्र आता नव्या नियमामुळे एका रुपयांचा व्यवहारही शोधणे सोपे होणार आहे. पैसे काढणे आणि ठेवींसाठीचा हा नवा नियम आर्थिक फसवणूक कमी करण्यासाठी आहे.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, रोखीने होणाऱ्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यास यातून मदत होईल. पॅन-आधारमुळे बँकांना रेकॉर्डवरील ग्राहकांची तपशीलवार माहिती मिळण्यास मदत होईल. तसेच कर विभागाला काही त्रुटी दूर करण्यास याची मदत होईल. त्यामुळे पॅन कार्ड नसलेल्या पण मोठ्याप्रमाणात रोखीने व्यवहार करणाऱ्या आणि आयकर न भरणाऱ्या ग्राहकांचा शोध घेणे सोपे होईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.