Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मृतीभवन होण्यासाठी केंद्राचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

सांगली शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मृतीभवन होण्यासाठी केंद्राचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.


सांगली दिं.१६:   सांगली शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मृतीभवन होण्यासाठी केंद्राचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

  अण्णा लोक सेवा फाउंडेशनच्या  वतीने फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक मासाळे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांची भेट घेऊन सांगली शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक तातडीने उभे राहावे यासाठी आपण प्रयत्न करावा अशा आशयाचे निवेदन दिले 

  अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीवर्षा निमित्त  राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात अण्णाभाऊ साठे स्मृती भवन उभारण्याचा निर्णय घेतला. या स्मृती भवनात अभ्यासिका व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. सांगली जिल्ह्यात ही हे  स्मृती भवन उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी ५० लाखाचा निधी मंजूर केला आहे. अण्णाभाऊ साठे स्मृती भवन उभारण्यासाठी महापालिका क्षेत्रात भूखंड उपलब्ध करून हे स्मृती भवन उभारावे यासाठी गेल्या अनेक वर्ष अण्णा लोकसेवा फौंडेशन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी निवेदने, सह्यांची मोहीम, आंदोलने असे अनेक मार्ग अवलंबले  जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांची भेट घेऊन या  अण्णाभाऊ साठे स्मृती भवनाचे काम तातडीने मार्गी लावा अशी आग्रहाची मागणी अशोक मासाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली या शिष्टमंडळात जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक यशवंत माळी, माणिक घसरते, माजी महापौर  विवेक कांबळे ,नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते होते.

   अण्णाभाऊ साठे स्मृतीभवन तातडीने उभारण्यासाठी केंद्र सरकारचा निधी दिला जाईल.निधीअभावी काम थांबणार नाही असा विश्वास आठवले यांनी यावेळी दिला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.