Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'केतकीच्या पोस्टमुळे पाटील मेला हे तरी कळलं', सदाभाऊ खोत आता जाहीर सभेत बोलले

 'केतकीच्या पोस्टमुळे पाटील मेला हे तरी कळलं', सदाभाऊ खोत आता जाहीर सभेत बोलले


टेंभुर्णी, २० मे : 'केतकी चितळेनं तशी पोस्ट टाकायला नको होती. इतकी वाईट पोस्ट कशाला शेअर करायची. पण, काय झालं या पोस्टमुळे पाटील मेला आहे की नाही हे कळलं' असं म्हणत पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत  यांनी भाष्य केलं आहे.

त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी सुरू केलेल्या जागर शेतकऱ्यांचा आक्रोश महाराष्ट्राचा या राज्यव्यापी अभियानाचा आज टेंभुर्णी येथे समारंभ होत आहे. याप्रसंगी राज्याचे भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे खासदार रंजीत सिंह निंबाळकर, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपाचे नेते या सभेला उपस्थित होते.यावेळी सदाभाऊ खोत यांनी पुन्हा एकदा केतकी चितळे प्रकरणावरून भाष्य केलं. 'फडणवीस साहेब तुम्ही परत याच, आमची सुद्धा केतकी चितळे सारखी अवस्था झाली आहे.

राज्यभर पोलीस स्टेशनला फिरावे लागत आहे. केतकी चितळेनं तशी पोस्ट टाकायला नको होती. इतकी वाईट पोस्ट कशाला शेअर करायची. पण, काय झालं या पोस्टमुळे पाटील मेला आहे की नाही हे कळलं, नाहीतर गावाला माहिती नव्हतं.

आमच्यावर सुद्धा असेच गुन्हे दाखल झाले, त्यामुळे राज्यभर पोलीस स्टेशनमध्ये फिरावं लागत आहे, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं. मुख्यमंत्री ठाकरे मास्क उतरवणार म्हणे, ते काय चंद्राचा मुखडा आहे का? 13 कोटी जनता हे सहन करणार नाही अरे 13 कोटी जनता तुमचं प्रोडक्शन आहे का? अशी टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली.

वीज मोफत दिली नाही, सात बारा कोरा केला नाही. उजणीचे पाणी बारामतीला निघालंय, बारामतीने नीरा नदी लुटली, आता उजनी लुटत आहेत. आम्ही उजणीचे पाणी जाऊ देणार नाही. उजनीच्या पाण्यासाठी संघर्षाला तुमची साथ द्या. पालकमंत्री दत्ता मामा तुम्ही कंस मामा बनू नका, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची अलिबाबाची टोळी आहे. फडणवीस यांना त्रास देण्यासाठी मराठा, धनगर आरक्षणासाठी मोर्चे कुठे गेले, आता कुठं गेलं आरक्षण?पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, अशी टीकाही खोत यांनी केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.