Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठ गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित

ओबीसी, व्हीजे एनटी आरक्षणासाठ गठित केलेल्या समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम घोषित


नागरिकांना 20 मे  रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत निवेदने सादर करण्याचे आवाहन


सांगली दि. 19  :‍ महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी  भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संधटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार समर्पित आयोग हे शनिवार, दि. 21 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे येथे भेट देणार आहेत. समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत यासाठी जिल्हास्तरावर उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांचा संपर्क क्रमांक व पत्ता पुढीलप्रमाणे आहे. संपर्क क्रमांक-0233-2600185 ईमेल- dcrsangli@gmail.com. पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, विजयनगर, सांगली, ता. मिरज, जि. सांगली-416415. नागरिकांनी त्यांची निवेदने  दि. 20 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत सादर करावीत. निवेदन सादर करताना निवेदनामध्ये नागरिकांनी त्यांचे नाव, संपूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी अचूकपणे नमुद करावा. जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे प्राप्त होणारी निवेदने दि. 20 मे 2022 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत. 

जे नागरिक समर्पित आयोगाचे भेटीचे वेळी परस्पर निवेदन देवू इच्छितात त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे विभाग पुणे येथे दि. 20 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत निवेदने द्यावीत. 20 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या निवेदनाबाबतच मागासवर्ग आयोग यांच्याकडून दि. 21 मे 2022 रोजी भेटीची वेळ कळविण्यात येणार आहे. बैठकीचे ठिकाण हे विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांच्या कार्यालयातील सभागृह असेल, असे उपजिल्हाधिकारी (महसूल) मोहिनी चव्हाण यांनी कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.