Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भविष्याचा विचार करून सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आत्ताच उपाययोजना कराव्यात :- खासदार अॅड. वंदनाताई चव्हाण

भविष्याचा विचार करून सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आत्ताच उपाययोजना कराव्यात :- खासदार अॅड. वंदनाताई चव्हाण



सांगली : ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीचे दुश्यपरिणाम आत्ताच दिसू लागले आहेत. परदेशांमध्ये याबाबत नियोजन करून प्लॅन तयार करण्यात येत आहेत. भारतातही भविष्याचा विचार करून सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आत्ताच उपाययोजना आखाव्या लागतील असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी अर्बन सेलच्या अध्यक्षा अॅड. वंदनाताई चव्हाण यांनी दि. सांगली ट्रेडर्स को-ऑप. क्रेडिट सोसायटी सांगलीच्या सभागृहात विविध क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांच्या संबंधित प्रश्न, मदतीचे धोरण, पर्यावरण जागृती याबाबत कार्य कसे करता येईल याबाबतचे चर्चासत्र आयोजित केले होते त्यावेळी केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा एनसीपी अर्बन सेलचे प्रदेश सेक्रेटरी सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी अर्बन सेलचे समन्वयक नितीन जाधव, राष्ट्रवादी संघटक शेखर माने, नगरसेवक हरिदास पाटील, ज्योती आदाटे, प्रा. रवींद्र फडके, वंदना चंदनशिवे, तसेच पर्यावरण संघटना, सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

यावेळी खासदार अॅड. वंदनाताई चव्हाण म्हणाल्या, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, तज्ञ यांच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याच्या दुवा म्हणून राष्ट्रवादी अर्बन सेलची स्थापना झाली आहे. पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून समाजकार्य व देशकार्यासाठी अर्बन सेलचा प्रयत्न सुरू आहे. स्वयंसेवी संस्थांचे अनेक प्रश्न असतात त्या सोडवण्यासाठी दुवा बनून व शासन दरबारी नेऊन तो सोडवला जावा हा आमचा प्रयत्न असतो. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. गावाकडील लोक शहराकडे स्थलांतरित होऊ लागल्याने झोपडपट्ट्यांची समस्या निर्माण होत आहे. गरजू गरिबांना माफक दरात घरे मिळाली पाहिजेत. स्वयंसेवी संस्था तज्ञांचे महापालिका, क्षेत्रीय कार्यालयामध्ये नामांकन झाले पाहिजे. स्वयंसेवी संस्था अनेक आहेत व त्यांना मनापासून कार्य करण्याची इच्छा आहे. त्यांना पाठबळ देण्यासाठी राष्ट्रवादी अर्बन सेल प्रयत्नशील आहे. तसेच जागतिक तापमान वाढीवर ‘टेरी’ या संस्थेच्या रिपोर्टनुसार पुर, नैसर्गिक आपत्ती, ढगफुटी यासारखे प्रकार वाढत असून कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वाढत असल्याने वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. ग्लास विरहित इमारती निर्माण झाल्या पाहिजेत. अनेक प्राणी नामशेष होत असल्याने ही संकटे मानवासाठीही घातक ठरू शकतात यासाठी आपण सर्वांनी पर्यावरण संरक्षण बाबत जागरूक राहून आवाज उठवला पाहिजे.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपल्या स्वागत व प्रास्ताविकामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अर्बन सेलचे कार्य सुरू असून त्या माध्यमातून विविध समाजोपयोगी बाबींची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कोरोनाचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील महापालिकाचा दौरा अर्बन सेल मार्फत झाला. त्यावेळी अर्बन सेलची भूमिका मांडली गेली. यामध्ये समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील, विविध पक्षातील, तज्ञ, प्राध्यापक, व्यापारी, उद्योजक यांना एकत्रित करून त्यांच्या सूचना घेऊन समाजासाठी काय करता येईल याबाबत व त्या सोडवण्यासाठी अर्बनचा सेलचा प्रयत्न राहणार आहे. 

याप्रसंगी संवेदना फाउंडेशनचे रौनक शहा यांनी गोशाळेच्या माध्यमातून ‘गोवऱ्याचा’ वापर केल्यामुळे स्मशानभूमीतील लाकूड वापर करण्याच्या प्रमाणात कपात होईल. आरंभ संस्थेचे राहुल देवल यांनी मधमाशांना पोळे काढतेवेळी माशांना जाळल्याने त्यांचे प्रमाण कमी होत असून पर्यावरणातील फुले, फळे यांच्या नैसर्गिक वाढीवर परिणाम होत आहे. तसेच स्नेहल प्रतिष्ठानचे स्नेहल गौंडाजे यांनी स्वयंसेवी संस्थांना आर्थिक अडचणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने सीएसआर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी ‘बेघर निवारा’ ची डागडुजी करून मिळावी तसेच आश्रम शाळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. याप्रसंगी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, सुरज फौंडेशनचे प्रविण लुंकड, रोटरी क्लब ऑफ सांगलीचे उदय पाटील, आपतकालीन लाईफ गार्ड सेवा संस्थाचे अजित पाटील, जायन्ट्स ग्रुप ऑफ सांगली च्या गितांजली उपाध्ये, अनिमल सहारा फौंडेशनचे इम्तियाज शेख विविध प्रतिनिधीनी आपली मते व्यक्त केली. आभार अमोल चौगुले यांनी मानले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.