Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केतकी चितळे प्रकरणाला नवं वळण, 'ही' महत्त्वाची माहिती समोर

 केतकी चितळे प्रकरणाला नवं वळण, 'ही' महत्त्वाची माहिती समोर


मुंबई : अभिनेत्री केतकी चितळेनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणावर अत्यंत खालच्या शब्दात टीका केल्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं. शरद पवांराविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. केतकी चितळे चांगलीच अडचणीत सापडली असताना या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.

शरद पवारांविरोधात केतकी चितळेनं फेसबुकवर जी पोस्ट केली ती पोस्ट तिला कोणीतरी पाठवली अथवा तिला ती कोणत्यातरी ग्रुपवरून आली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर केतकीने तिच्या मोबाईलमधील मेसेजेस डिलीट केले असल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, केतकी व्हॉट्सअॅप वापरत नसली तरी ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. त्यामुळे ती इतरांशी कसं संपर्कात राहायची याचा पोलीस तपास करत आहेत. तर केतकीचा लॅपटॉप व मोबाईल सायबर शाखेकडे असून याच्या अहवालावर तपासाची पुढची दिशा ठरणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.