Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

‘दक्षिण भारत जैन सभा शताब्दी महाअधिवेशनासाठी सांगलीनगरी सज्ज’ शुक्रवारी भव्यदिव्य स्वरूपात शोभायात्रा ने शुभारंभ

‘दक्षिण भारत जैन सभा शताब्दी महाअधिवेशनासाठी सांगलीनगरी सज्ज’ शुक्रवारी भव्यदिव्य स्वरूपात शोभायात्रा ने शुभारंभ



सांगली : दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून जैन समाजाच्या संस्कार, शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, कृषी व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी संस्थेचे शताब्दी महाअधिवेशन १४ व १५ मे रोजी कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथनगर येथे होत असून उद्या शुक्रवारी दि. १३ मे २०२२ रोजी सायं. 0४ वा. सांगली जैन बोर्डिंग ते कल्पद्रुम क्रीडांगण नेमिनाथनगर, सांगली येथे जैन समाजाची वैभवशाली परंपरा शोभायात्रेच्या स्वरूपात पाहावयास सांगलीनगरीस मिळणार आहे. या शोभायात्रेस आरोग्य राज्यमंत्री तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, द.भा.जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब (दादा) पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, महाअधिवेशनाचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील, आम. अभय पाटील, खजिनदार सागर वडगावे, शोभायात्रा संयोजक मोहन नवले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


या शोभायात्रेमध्ये कर्नाटक राज्याचे शिमोगा ‘वीर कथेनृत्य’, स्नेह ज्योत महिला ढोल पथक महावीरनगर सांगली, नववारी साडीमध्ये दुधगावचे वीर महिला मंडळ लेझीम पथक, राजमती महिला मंडळ लेझीम पथक, राजमती योग पार्कचे मोहन कवठेकर व अर्चना कवठेकर, शैलेश कदम, विनायक रामदुर्ग, यांचे योगा प्रात्यक्षिक, वीराचार्य विद्यामंदिर सावळवाडी व श्रीमंती पाटील हायस्कूल नांद्रे यांचे मुलांचे लेझीम पथक, वीरसेवा दल शाखा कसबे डिग्रज व देसाई इंगळी यांचे झांज पथक, चिंचवाड हायस्कूल चिंचवाड यांचे शाहू महाराज, आण्णासाहेब लठ्ठे, कर्मवीर भाऊराव पाटील जीवनपट, दक्षिण भारत जैन सभेच्या संस्थापक व्यक्तींचे जीवनपट चित्ररथ, राजमती गर्ल्स हायस्कूलचा भगवान आदिनाथ ‘स्त्रीशिक्षण’ चित्ररथ, जैन महिला परिषदेच्या चित्ररथ, वीराचार्य आयटीआयचा ‘आयटीआय मॉडेल’, सांगली हायस्कूल सांगलीचा ‘राष्ट्रीय एकात्मता चित्ररथ’, रुई व जयसिंगपूर येथील महिलामंडळाचा चित्ररथ, समडोळी महिला मंडळाचे पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. या महाअधिवेशनामध्ये शोभायात्रेनंतर सायं. ६ वा. सांगली शहरांमध्ये प्रथमच राष्ट्रीय कीर्तीचे हास्य कवि संमेलनाच आयोजन केले असून इंदूरचे जॉनी बैरागी, रतलामचे बृजराज ‘बृज,’ मुंबईचे हिमांशू बवंडर, धारचे डॉ. लोकेश जडिया, उदयपूरचे जगदीप जैन ‘हर्षदर्शी’ आदी दिग्गज हास्यकवि आपली हास्य कविता सादर करणार आहेत. 

  या शोभायात्रेत २००० हून अधिक श्रावक श्राविकांचा सहभाग राहणार असून, जैन समाजाच्या सर्व संस्था, तसेच दक्षिण भारत जैन सभेच्या सर्व शाखा व त्यांचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.