रमजान ईदच्या निमित्ताने शैलजाभाभी पाटील यांचेकडून मुस्लीम महिलांना दूध वाटप
सांगली – दि. ३० : मुस्लीम धर्मियांचा उपवासाचा पवित्र रमजान महिना मध्ये रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी प्रकाशबापू पाटील यांनी मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली, येथील मुस्लीम समाजातील गोर- गरीब गरजू व महिला कामगार यांना दुधाचे वाटप करण्यात आले. सर्व सामान्य मुस्लीम कुटुंबियांना आपण सर्वांनी मदतीचा आधार देवून रमजान ईदच्या सणामध्ये त्यांचा आनंद द्विगुणीत करावा असे आवाहन शैलजाभाभी यांनी केले.
यावेळी अर्चना कबाडे, रुकसाना तांबोळी, परवीन बेपारी, शमा शेख,सरताज तांबोळी, अलका करजगार, हेरवाडे, मोहसीन गडेकरी, शाहरुख शेख, आदि महिला व पुरूष कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.