Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय गांधी निराधार योजना समितीची 8 वी बैठक पार पडली

संजय गांधी निराधार योजना समितीची 8 वी बैठक पार पडली


सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना जयंत पाटील साहेबांच्या शिफारसीनुसार स्थापण झालेल्या महाविकास आघाडीच्या संजय गांधी निराधार योजना समितीची 8 वी बैठक पार पडली आजच्या बैठकीत 114 प्रस्ताव मंजूर करण्यात आले तसेच 54 प्रस्ताव अपात्र असल्याने निकाली काढण्यात आले यावेळी या समितीच्या अध्यक्षा ज्योती आदाटे म्हणाल्या की समिती स्थापण होऊन 19 महिने झाले आज अखेर 805 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 

यामध्ये विधवा परित्यक्ता घटस्फोटीता प्रौढ कुमारिका दिव्यांग दुर्धर आजारी  वृद्ध निराधार तसेच कोरोना काळात दुर्दैवाने वैधव्य झालेल्या भगिनी इ चा समावेश होता तसेच जे कोणी लाभार्थी अद्याप या योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी तात्काळ या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.


तसेच पुढे त्या म्हणाल्या की कागदपत्रांचा बाऊ करू नये रितसर माहिती घेऊन प्रस्ताव स्वतः करावा काही मदत लागल्यास आमच्या समितीशी व आमच्या प्रशासना शी संपर्क साधावा.अगदी समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत असणाऱ्या कार्यकर्त्यांना ही आवाहन केले की त्यांनी आपापल्या भागात प्रशिक्षण शिबीरे घेऊन लाभार्थ्यांना प्रशिक्षित करावे यासाठी आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहोत जेणेकरून दलालांकडून होणार्या आर्थिक पिळवणूकीतुन वंचित घटकांची सुटका होईल या बैठकीला समिती सदस्या आशा ताई पाटील अनिता ताई निकम सदस्य संतोष भोसले आप्पासाहेब ढोले तहसीलदार के व्ही घाडगे साहेब तलाटी मुलाणी मॅडम  खतिब सर लिपिक सचिन गुरव आणि स्वीय सहायक प्रियांका तुपलोंडे इ उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.