Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; बेळगावात भीषण अपघात, 7 ठार, 6 जखमी

 हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; बेळगावात भीषण अपघात, 7 ठार, 6 जखमी


बेळगावात हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळानं घाला घातला आहे. भरधाव क्रूझरनं झाडाला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. बेळगावात धारवाड तालुक्यातील बाड गावाजवळ ही दुर्घटना घडली.

शुक्रवारी मध्यरात्री धारवाड तालुक्यातील बाड गावाजवळ हा अपघात घडला. लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटपून पाहुणे पुन्हा घरी परतत असताना हा अपघात झाला. अपघातातील मृत व्यक्ती बेंनकट्टी गावचे आहेत. निगडी गावातील मुलाच्या हळदीला क्रुझर गाडीतून पाहुणे मंडळी गेली होती. अचानक झालेल्या पावसामुळे लग्नाचं ठिकाण बदलण्यात आलं होतं. मन्सूर गावाकडून बेनकट्टी गावाला परत येत असताना हा अपघात घडला. 

अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत.झाडाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे क्रूझर गाडीचा चेंदामेंदा झाला. तसेच, आत असलेल्या प्रवाशांपैकी 7 जण जागीच ठार झाले. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस प्रमुख कृष्णकांत यांनी भेट दिली. अपघातातील जखमींना त्वरित धारवाड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धारवाड ग्रामीण पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.