Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या' राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर, 7 जणांचा मृत्यू; 2 लाखांहून अधिक प्रभावित

 'या' राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर, 7 जणांचा मृत्यू; 2 लाखांहून अधिक प्रभावित


आसाम, 18 मे: देशाच्या अनेक भागात उन्हाचा तडाखा बघायला मिळतोय. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसाने आसाममध्ये कहर केला आहे. आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळे  20 जिल्ह्यांमध्ये सुमारे 2 लाख लोक बाधित झाले आहेत. त्याच वेळी आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा रेल्वे संपर्क तुटला असून, वाहने पाण्यात तरंगताना दिसत आहेत. कछार जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे आणखी दोन मृत्यूंसह मृतांची संख्या 7 वर पोहोचली आहे, जिथे आतापर्यंत 24 जिल्ह्यांमध्ये 2 लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.


अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. एकूण मृतांची संख्या 7 आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गेल्या 24 तासांत दक्षिण आसामच्या कछार जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला, तर यापूर्वी दीमा हासाओ (४) आणि लखीमपूर (१) जिल्ह्यात भूस्खलनात ५ जणांचा मृत्यू झाला. बुरखा घालून आले, अन् दारुच्या दुकानात पोहोचताच फेकला हँडग्रेनेड; 1 ठार, तीन जखमी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कछार जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे 6 लोक बेपत्ता आहेत. दरम्यान कछार जिल्ह्यातील एका अनधिकृत अहवालात असे म्हटले आहे की, जिल्ह्यातील वेगवेगळ्या नद्यांमध्ये एक लहान मूल आणि दोन मध्यमवयीन लोकांसह चार लोक वाहून गेले आहेत.

24 जिल्ह्यातील 811 गावं प्रभावीखाली ASDMA बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, 24 जिल्ह्यांतील 811 गावांमध्ये 2,02,385 लोक प्रभावित झाले आहेत आणि सुमारे 6,540 घरांचे अंशतः आणि पूर्णपणे नुकसान झाले आहे. 33,300 हून अधिक लोकांनी 72 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे, तर जिल्हा प्रशासनाने 27 मदत वितरण केंद्रे उघडली आहेत. हे क्षेत्र सर्वाधिक प्रभावित कछार, दिमा हसाओ, होजाई, चराईदेव, दरंग, धेमाजी, दिब्रुगड, बजली, बक्सा, विश्वनाथ आणि लखीमपूर हे जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. ईशान्य फ्रंटियर रेल्वे (NFR) च्या दिमा-हसाओ जिल्ह्याच्या अंतर्गत असलेल्या डोंगराळ विभागातील परिस्थिती मंगळवारी भीषण राहिली कारण डोंगराळ भागात पाऊस सुरूच होता, ज्यामुळे लुमडिंग-बदरपूर सिंगल लाइन रेल्वे मार्गावर परिणाम झाला. रेल्वेशी संपर्क तुटला आसाममधील लुमडिंग-बदरपूर विभाग हा त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर आणि आसामचा दक्षिण भाग देशाच्या इतर भागांशी जोडणारा एकमेव मार्ग आहे. गेल्या चार दिवसांपासून हा रेल्वे संपर्क तुटल्याने जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.