Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 31 मे रोजी लाभार्थ्यांशी साधणार संवाद

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 31 मे रोजी लाभार्थ्यांशी साधणार संवाद



सांगली दि. 29  : भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या वतीने देशभरात आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याअनुषंगाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दि. 31 मे 2022 रोजी शिमला, हिमाचल प्रदेश येथून आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाव्दारे राज्य व जिल्हास्तरावर PRI, स्वातंत्रयसैनिकांच्या कुटुंबियांसह निवडक लाभार्थी यांच्याशी संवाद साधणार आहेत.

दिनांक 31 मे 2022 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी राज्य व जिल्हास्तरावरून वर्च्युअल जोडली जातील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा परीसंवाद कार्यक्रम दोन भागांमध्ये आयोजित केला जाणार आहे. संवादाचा पहिला भाग राज्य आणि जिल्हा कार्यक्रमांच्या स्वरूपात सकाळी 10.15 वाजता सुरू होईल आणि सकाळी 10.50 वाजता समारोप होईल. या प्रसंगी पीएम किसान सन्मान निधीचा 11 वा हप्ता देखील लाभार्थ्यांना हस्तांतरित केला जाईल.

संवादाच्या दुसऱ्या भागात राज्य आणि जिल्हास्तरावरील कार्यक्रम शिमला येथील राष्ट्रीय कार्यक्रमाशी जोडले जातील, जिथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी निवड केलेल्या योजनांच्या जिल्ह्यांसोबत निवडक लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे आभासी संवाद साधतील. या राष्ट्रीय कार्यक्रमाचे दूरदर्शन आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील चॅनेलवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. युट्युब आणि NIC चॅनेलव्दारे वेबकास्ट देखील केले जाणार आहे. या कार्यक्रमाचे जिल्हास्तरावर ‍जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आयोजन केले आहे.

 दिनांक 31 मे 2022 रोजी शिमला, हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 9.45 वाजता राज्य मुख्यालय /जिल्हा मुख्यालय / कृषी विज्ञान केंद्र येथे लाभार्थ्यांचे आगमन. सकाळी 9.45 ते 10.15 वाजेपर्यंत विविध योजनांवरील चित्रपटांचे प्रदर्शन (१३ भाषांमध्ये). सकाळी 10.15 ते 10.50 वाजेपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील/ कृषी विज्ञान केंद्र लाभार्थ्यांशी मान्यवरांचा समांतर संवाद. राज्य/जिल्हा/ कृषी विज्ञान केंद्रे प्रधानमंत्री यांच्या कार्यक्रमासाठी जोडणार. सकाळी 10.55 वाजता शिमला येथे कार्यक्रम स्थळी प्रधानमंत्री  यांचे आगमन. सकाळी 10.55 ते सकाळी 11 वाजेपर्यंत प्रधानमंत्री यांचे पारंपारिक पध्दतीने स्वागत. सकाळी 11 ते दुपारी 12.10 वाजेपर्यंत हिमाचल प्रदेश मुख्यमंत्री यांचेव्दारे स्वागत (2 ‍मिनीटे), विविध लाभदायी योजनांवर चित्रपट (5 ‍मिनीटे), प्रधानमंत्री यांचा लाभार्थ्यांशी संवाद (30 मिनीटे), ‍किसान सन्मान निधी ‍वितरण (2 मिनीटे), प्रधानमंत्री यांचे भाषण (30 मिनीटे).


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.