Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 मे पर्यत मुदतवाढ - सहायक आयुक्त जयंत चाचरकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 31 मे पर्यत मुदतवाढ - सहायक आयुक्त जयंत चाचरकर



सांगली दि. 13  : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2021-22 या वर्षांकरीता अनुसचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी 31 मे 2022 पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली आहे. 

स्वाधार योजनेअंतर्गत सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालीकेच्या हददीतील तसेच हददीपासुन 5 कि.मी. परिसरात असलेली महाविदयालये/ शैक्षणिक संस्थामधील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11वी, 12 वी तसेच इयत्ता12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विदयार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणुन भोजन भत्ता, निवास भत्ता तसेच शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात रक्कम विदयार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर सन 2020-21 व सन 2021-22 मधील पात्र विदयार्थ्यांनी 31 मार्च 2022 अखेर अर्ज सादर करणेबाबत शासनाचे निर्देश होते. तथापि, सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजुनही सुरु असल्याने या योजनेंतर्गत पात्र व गरजु लाभार्थी वंचित राहु नये. यासाठी 31 मे 2022 पर्यंत अर्ज करणेसाठी मुदतवाढ दिली आहे. तरी सहायक आयुक्त, समाज कल्याण, सांगली (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगावरोड, संभाजीनगर, सांगली) यांचेकडे जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी केले आहे.

अधिक माहीतीसाठी- सहायक आयुक्त, समाज कल्याण (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जुना बुधगावरोड, संभाजीनगर, सांगली. दुरध्वनी क्रमांक -0233 -2374739, E-mail ID- acswosangli@gmail.com) येथे सपर्क साधावा. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.