Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाज्योतीतर्फे सांगली येथे 31 मे रोजी नि:शुल्क प्रवेशासह ‘तृतीय रत्न’ एकुण 22 प्रयोगाची यशस्वी वाटचाल रंगमंचावरील पहिले राजकीय नाटक

महाज्योतीतर्फे सांगली येथे 31 मे रोजी नि:शुल्क प्रवेशासह ‘तृतीय रत्न’ एकुण 22 प्रयोगाची यशस्वी वाटचाल रंगमंचावरील पहिले राजकीय नाटक


सांगली दि. 30 :  विष्णुदास भावे नाट्यगृह सांगली येथे आज दिनांक 31 मे 2022 रोजी सायंकाळी 7 वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाट्यप्रयोगासाठी नि:शुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणीक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष विजय वडेट्टीवार, संचालक डॉ. बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे, लक्ष्मण वडले यांनी महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग करण्याचे योजिले आहे.


अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण ३० कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात अठरा प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. प्रेक्षक आणि माध्यमांकडून त्याला उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. सदर नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांनी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.