Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दीपक चव्हाण यांचे 25 देशभक्तीपर गाण्यांचे कार्यक्रम पूर्ण

 दीपक चव्हाण यांचे 25 देशभक्तीपर गाण्यांचे कार्यक्रम पूर्ण 


सांगली : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते दीपक भीमराव चव्हाण यांनी आपले 25 देशभक्तीपर गाण्यांचे कार्यक्रम पूर्ण केले आहेत. 25 वा कार्यक्रम नुकताच हुतात्मा स्मारकामध्ये पार पडला. यावेळी 75 पैकी 25 कार्यक्रम पूर्ण केल्याबद्दल रोटरी क्लबकडून एडी पाटील, शिवपुत्र अरबोळे यांनी दीपक चव्हाण यांचा विशेष सन्मान केला. 7 एप्रिल रोजी दीपक चव्हाण यांनी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 75 ठिकाणी देशभक्तीपर गीतांचे कार्यक्रम करण्याच्या उपक्रमास सुरवात केली होती. 

20 मे रोजी 25 कार्यक्रम पूर्ण झाले असून 15 ऑगस्ट रोजी सांगलीत 75 वा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम करीत या अभियानाची सांगता केली जाणार आहे. आतापर्यंतचे 25 देशभक्तीपर गाण्यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनाली केंकडे, जयश्री जाधव , अनिस जामदार, राम नाईक, सुहास फडतरे , मिलिंद बनसोडे , नवीन संबोधी , गिरीश लोहाना , संदीप साबळे यांची विशेष साथ सहभाग सहकार्य लाभला आता लवकरच 50 वा कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे शोलेस्टाईल सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यानी केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.