Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेरोजगार उमेदवारांसाठी 25 व 26 मे रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा

 बेरोजगार उमेदवारांसाठी 25 व 26 मे रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा


       सांगली, दि. 24, : नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांसाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्यावतीने दि. 25 व 26 मे 2022 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा रोजगार मेळावा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.


हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपआपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे https://mahaswayam.gov.in या संकेतस्थळाव्दारे लॉगीन करून आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या उचित असलेल्या रिक्तपदांसाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावी. पसंतीक्रम नोंदवताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणच्या आसपासच्या कंपनीची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करावी. उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमसएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीचे आयोजन करण्यात येईल. उमेदवारांनी दि. 25 मे 2022 पर्यंत पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण असेल तर 0233-2990383 वर किंवा sanglirojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.


या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सेल्स असोसिएशन, टेक्निशियन, सेल्स एक्झिक्युटिव्ह, डिजीटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, कॉम्प्युटर हार्डवेअर / सॉफ्टवेअर स्पेशालिस्ट ॲण्ड ई.टेंन्डरिंग एक्झिक्युटिव्ह, सी.एन.सी ऑपरेटर, प्रेस मशिन ऑपरेटर, हेल्पर, सुपरवायझर, सेल्स कन्सलटंट, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिस्ट, ऑडिट अकौटंट, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, स्टोअर किपर, पर्चेस एक्झिक्युटिव्ह, पर्चेस एक्झिक्युटिव्ह आऊटसोर्स, कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, एचआर ॲण्ड ॲडमिन एक्झिक्युटिव्ह, पीपीसी हेड, प्रॉडक्शन सुपरवायझर, ड्राफ्ट्समेन, फिटर, वेल्डर, आटो इलेक्ट्रीशियन, अेसी ॲण्ड रेफ्रिजेशन व सीट मेटल इत्यादी जागा www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अधिसुचित करण्यात आलेल्या आहेत. या पदासाठी इ. 10 वी, 12 वी, पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर, संगणक, तसेच आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग पदवी/ पदविका इत्यादी विविध शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारासाठी रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.