नविन संस्थांना अभ्यासक्रम/तुकडी सुरु करण्याचे प्रस्ताव 15 मे पर्यंत सादर करावेत
सांगली दि. 12 : जिल्ह्यातील व्यवसायिक प्रशिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांनी सन 2022-23 या वर्षासाठी प्रवेश सत्रात नविन संस्थांना तसेच अस्तिवात असलेल्या संस्थांमध्ये नविन अभ्यासक्रम किंवा तुकडी सुरु करण्याचे प्रस्ताव दिनांक 15 मे 2022 पर्यंत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयद्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसंतदादा औद्योगिक वसाहत, आर.टी.ओ ऑफिस जवळ सांगली येथे सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत यांची नोंद घ्यावी असे निरिक्षक, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, सांगली कळविले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.