केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा 14 मे रोजीचा सांगली जिल्हा दौरा
सांगली दि. 13 : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा दिनांक 14 मे 2022 सांगली जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे
शनिवार दिनांक 14 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, सांगली येथे जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या समवेत सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणी बाबत आढावा बैठक. सकाळी 10.45 वाजता शासकीय विश्रामगृह, सांगली येथे पत्रकार परिषद. सकाळी 11.45 वाजता लाल वाघमारे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. स्थळ-जुने एस.टी. स्टॅण्ड तहसिलदार कार्यालयाजवळ कवठेमहांकाळ.
दुपारी 12 वाजता ज्येष्ठ नागरिक कल्याण कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती स्थळ -कन्या प्रशाला कवठेमहांकाळ. दुपारी 12.15 वाजता कवठेमहांकाळ येथील सिव्हिल हॉस्पिटल जवळ कै. पिंटू माने यांच्या घरी कुटुंबियांची सात्वंनपर भेट. दुपारी 12.45 हिंगणगाव ता. कवठेमहांकाळ येथील श्री. देवानंद लोंढे याच्या पायोध इंडस्ट्रिला सदिच्छा भेट. दुपारी 1.30 वाजता नागरिकांसमवेत बैठक स्थळ - श्रीराम विद्यामंदीर हायस्कूल मैदान, तहसिलदार कार्यालयाजवळ जत. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह जत येथे राखीव. दुपारी 4.30 वाजता आगळगाव ता. कवठेमहांकाळ येथील समाज मंदीराच्या (कम्युनिट हॉल) उद्घाटनास उपस्थिती. सायंकाळी 6.15 वाजता तासगाव येथे स्थानिक कार्यक्रमास उपस्थिती स्थळ-सैनिक शाळा मैदान तासगाव. रात्री 7.30 वाजता शासकीय विश्रामगृह तासगाव येथे राखीव. रात्री 10.35 वाजता किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशन येथे आगमन व महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.