Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बार चालकावर कारवाई करण्यास टाळाटाळ

 बार चालकावर कारवाई करण्यास टाळाटाळ


त्या सदुनिमुळेच कारवाईस विलंब,  सदुनिकडे लाखाचा मोबाईल, आलिशान चारचाकी वाहन

सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावटीच्या दारू प्रकरणात संशयित व्यक्तीला दारू आणण्यासाठी भाग पाडलेला येलूरचा तो बार चालक अद्याप मोकाटच आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकरणाचा सूत्रधार असलेला सदुनि लाखाचा मोबाईल वापरत असल्याची चर्चा आहे शिवाय आलिशान चारचाकी वाहन वापरत असल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणातील एक संशयित आणि त्याच्या पत्नीवर त्या सदुनिने चांगलाच दबाव आणला आहे. त्यामुळे ते भीतीने परगावी गेले आहेत. शिवाय त्याच्या भितीपोटी एका संशयिताने त्याने केलेल्या कारभाराविषयी मौन बाळगले आहे. यावरूनच संशयितांवर किती दबाव आहे हे दिसून येते.

या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेला सदुनि लाखाचा मोबाईल वापरतो तर आलिशान गाडीतून फिरतो अशी चर्चा इस्लामपूर परिसरात आहे. त्यामुळे खासगी गाडीवर अंबर दिवा लावून फिरणाऱ्या या सदुनिची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. दरम्यान या सदुनिला कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची नोटीस दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.