सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का...
नवी दिल्ली : सरकार यंदा फिटमेंट फॅक्टरमध्ये किंचित वाढ करेल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. मात्र फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसणार आहे. 2022 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढणार नाही. सध्या सरकार फिटमेंट फॅक्टर वाढवण्याच्या बाजूने नाही. कोरोना महामारी आणि महागाईमुळे हा अतिरिक्त आर्थिक बोजा सध्या वाढवता येणार नाही.
पुढील वेतन आयोग कधी येईल हे सांगणंही कठीण आहे. सरकार असा फॉर्म्युला बनवण्याचा प्रयत्न करत आहे की ज्यामुळे वेळोवेळी पगार वाढेल. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचार्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्क्यांवरून 3.68 टक्क्यांपर्यंत वाढवावा, अशी दीर्घकाळापासूनची मागणी होती. तसेच मार्च महिन्याच्या पगारात वाढीव फिटमेंट फॅक्टर जाहीर केला जाऊ शकतो, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र आता या आघाडीवर कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने नुकतीच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने वाढ केली आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 34 टक्क्यांवर पोचला आहे. आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर येते आहे. ती अशी की, महागाई भत्त्यासोबतच इतर भत्तेही वाढू शकतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.