Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आ. जिग्नेश मेवानी यांची त्वरित सुटका करा शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

आ. जिग्नेश मेवानी यांची त्वरित सुटका करा शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकारी यांना निवेदन 


सांगली, दि.२६ : गुजरातमधील वडगामचे काँग्रेस पक्षाचे आमदार  श्री. जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी बेकायदेशीर रित्या अटक केली आहे त्यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी करणारे निवेदन सांगली शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने अध्यक्ष श्री पृथ्वीराज पाटील यांनी आज जिल्हाधिकारी श्री. अभिजित चौधरी यांना दिले. 

या निवेदनात म्हटले आहे की, गुजरातमधील पालनपूर सर्किट हाऊस येथून तीन दिवसापूर्वी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आमदार मेवाणी यांना बेकायदेशीरपणे अटक करून आसामला घेऊन गेले आहेत. आसाममध्ये त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून आ. मेवानी यांना पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. मा. पंतप्रधानांच्या नावाने एक ट्विट केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते.

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने देशाच्या पंतप्रधानांच्या नावाने काही अपेक्षा करणारे ट्विट करणे हा काही अपराध नाही. लोकशाही व संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे, परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मनमानीपणे, सर्व नियम, कायदे धाब्यावर बसून आ. जिग्नेश मेवानी यांच्यावर अटकेची कारवाई केलेली आहे. ही अटक बेकायदेशीर असून लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणारी आहे. आमदार जिग्नेश मेवानी यांची त्वरीत सुटका करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बिपीन कदम, रविंद्र खराडे, सनी धोतरे, महावीर पाटील, रघुनाथ नार्वेकर, आप्पासाहेब पाटील, आषिश चौधरी, मनोज पाटील, अक्षय पाटील उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.