Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संशयिताच्या गाडीतही दारू सापडल्याचा सदुनिचा बनाव फसला

संशयिताच्या गाडीतही दारू सापडल्याचा सदुनिचा बनाव फसला



मुंबईतील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार न करण्यासाठी संशयितावर दबाव

सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिने या प्रकरणातील एका संशयिताच्या गाडीत गोवा बनावटीची दारू सापडल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांमुळे फसला. दरम्यान त्या सदुनिने हा कारवाईचा फासर् केल्यानंतर सांगलीत पहिल्यांदा वरीष्ठांना त्याची कल्पना दिली. नंतर त्याने इस्लामपूरच्या प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती दिली. नंतर अधिकाऱ्यांनी त्याला स्पॉट वर थांबण्यास सांगितले होते. मात्र तो तेथून निघून गेला. वाघवाडी फाट्यावर अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी त्याने कोल्हापूरच्या अधिकाऱ्यांना कळवण्यास सांगितले. मात्र त्याने आधीच कारवाईची माहिती सांगलीतील अधिकाऱ्यांना दिली होती. त्यामुळे चिडलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्याला तूच कोल्हापूरला कळव असेही सांगितले.  

दरम्यान या सदुनिने एका संशयिताकडे पैशांची मागणी केली होती. वरीष्ठांना पैसे द्यावे लागत असल्याचेही सांगितले होते. दुपारी तीनपयर्त संशयिताकडून पैशांची व्यवस्था न झाल्याने त्याने कारवाई सुरू केली. यावेळी त्याने संशयिताच्या चारचाकी वाहनामध्ये दारूचे बॅक्स सापडल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला. मात्र इस्लामपूरच्या प्रभारी अधिकाऱ्यांमुळे त्याचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर त्यानेच यातील एका संशयिताला पळून जाण्यासाठी मदत केल्याची अजूनही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या सदुनिवर कारवाई होणे गरजेचे आहे. 

सांगलीतील एक्साईजच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी संशयितांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याचे समजते. मात्र सांगलीतील वरीष्ठ अधिकारीच त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याने संशयिताच्या तक्रारीनुसार त्या सदुनिवर खरच कारवाई होणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. एकंदरीतच या सदुनिला वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड त्याला वाचवण्यासाठी आहे की अधिकारी स्वतःला वाचवत आहेत अशी चर्चा एक्साईजमध्ये सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.