निसर्ग संपला तर माणूस संपेल
माधवनगर, ता. ४: माणूस पंचमहाभूतांनी बनला आहे. तो निसर्गाचेच एक अंग आहे. निसर्ग संपवला तर आपण सुद्धा संपून जाऊ, असा इशारा ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. दयानंद नाईक यांनी दिला. माणसाचे अस्तित्व टिकण्यासाठी निसर्ग टिकला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री महाराज पंचतत्त्व सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दुसरे ललित कला संमेलनामध्ये अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. हे संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पोळ यांनी पंचमहाभूतांविषयी वैज्ञानिक माहिती दिली. स्वागताध्यक्ष महेश कराडकर यांनी धावपळीच्या परिस्थितीमध्ये विविध कला आणि साहित्य माणसाच्या जगण्यात आनंद निर्माण करत असल्यामुळे या कला जपल्या पाहिजेत, असे आवाहन केले.
प्रा. डॉ. पद्मजा चौगुले, शाहीर बजरंग आंबी व प्रा. रवींद्र ढाले यांनीही मनोगत व्यक्त केले. संमेलनामध्ये पंचतत्त्व पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये डॉ. मनोज पाटील यांना वायुदेवता आरोग्यसेवा पुरस्कार, अभिजित पाटील यांना जलदेवता साहित्य सेवा पुरस्कार, भालचंद्र चितळे यांना आकाशदेवता रंगभूमी सेवा पुरस्कार, सुमित कुलकर्णी यांना .. पृथ्वीदेवता वसुंधरा सेवा पुरस्कार आणि वैभव चौगुले यांना अग्निदेवता समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रशांत जगताप, आनंद कुंभार, रमेश पाटील, शेखर देशपांडे, शृतिका भोसले, आकाश कदम यांनी मानपत्र वाचन केले.
संमेलनामध्ये सुमित डान्स ॲकॅडमीच्या कलाकारांनी गणेश वंदना सादर केली. अमोघराज आंबी याने पोवाडा सादर केला. मधुरा डिग्रजकर, कावेरी माने, विजयकुमार कोळी, मनीषा चराठे यांनी काव्यवाचन केले.
या संमेलनास भीमराव धुळूबुळू, प्रा. संजय ठिगळे, अमरनाथ खराडे, ऋषिकेश तुराई, नामदेव भोसले, मुकुंद पटवर्धन, अरुण गवंडी, अर्चना मुळे, श्याम दिगंबर माने, सुदर्शन जाधव, दिगंबर माने, तानवडे, सुहास पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.