संजय राऊत : तर कोल्हापूरकरांवर भाजी, मटण किती घेतलं यावर भाजपची नजर असेल
नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदानाच्या वेळी बँक खात्यात पेटीएमद्वारे पैसे पाठविले जाण्यासाठी ही माहिती गोळा केली जात असल्याचे समजते. कोणाच्या तरी खात्यातून मतदारांच्या खात्यात काळा पैसा पाठविणे हे मनी लाँडरिंग आहे. मनी लाँडरिंगच्या प्रयत्नाची ईडीकडे तक्रार करणार असून चौकशीची मागणी करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर मिश्किल टिप्पणी केली आहे.राऊत म्हणाले की, सध्या कोल्हापुरात भाजीची पेंडी घ्यायला गेला तरी भाजपवाल्यांचे लक्ष आहे. तुम्ही चिकण घेतला तरी तुमचे त्यांच्यावर लक्ष आहे. कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांचे काही पदाधिकारी फिरत आहेत एखाद्या माणसाने किती चिकण घेतले त्यांने भाजी किती विकत घेतली. त्यामध्ये काही बदल दिसला तर ते ईडीची चौकशी लावणार म्हणतात. यावर कोल्हापुरातील जनतेने सतर्क राहून खरेदी करावी अशी मिश्किल टिप्पणी संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत : शिवसेना दिल्लीत एकत्र काम करत आहे
दिल्लीत आम्ही सर्वजन एकत्र काम करत आहोत. आमच्या ह्रदयात सगळ्यांबद्दल प्रेम आहे. सध्या शिवसेनेचा जंनसंपर्क दौरा सुरू आहे यामध्ये शिवसेनेला सरकार म्हणून सामान्य शिवसैनिकांपर्यंत पोहोचावे लागेल. त्यासाठी शिवसेनेचे काही खासदार राज्यात व्यस्त आहेत. आम्ही जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी घराघरात पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या बांधणीसाठी तयारीला लागले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.