जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनात कर्नाटकातून जनसागराची उच्चांकी उपस्थिती राहणार.. -आमदार अभय पाटील
सांगली दि. दक्षिण भारत जैन सभेने गेल्या १२३ वर्षात भरीव कामगिरी केली आहे. सभेच्या शंभराव्या अधिवेशनात दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री व अनेक मंत्री यांच्या उपस्थितीत कर्नाटकातून जैन समाजाची उच्चांकी उपस्थिती राहील असे प्रतिपादन बेळगावीचे आमदार व अधिवेशन समितीचे कर्नाटक विभागाचे कार्याध्यक्ष आमदार अभय पाटील यांनी केले. ते सभेच्या शंभराव्या अधिवेशनाच्या माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंगच्या धर्मनाथ सभागृहात आयोजित अधिवेशन आढावा संवाद बैठकीत बोलत होते.अध्यक्षस्थानी सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील होते. ही बैठक रावसाहेब दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.
स्वागत बोर्डिंगचे चेअरमन पुष्पक हणमन्नावर तर प्रास्ताविक अधीक्षक अॅड. संजय कुचनूर यांनी केले. डॉ. अजित पाटील यांनी सभेच्या कार्याचा आढावा घेतला. चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले, सभेला १२३ वर्षे पूर्ण झाली आहेत. १४ व १५ मे रोजी होणारे हे अधिवेशन भव्य दिव्य स्वरुपात संपन्न होणार आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इतिहासात प्रथमच हे अल्पसंख्याक जैन समाजाची ताकद दाखवणारे शंभरावे अधिवेशन होत आहे. १२०० कार्यकर्ते झटत आहेत. उपस्थिती आणि निधीसाठी समाजाने सढळ हाताने मदत करावी.
माजी आमदार संजय पाटील यांनी समाजाने कर्तव्य म्हणून मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, एकत्र येऊन काम करा,ऐक्य महत्त्वाचे आहे. आम्ही तन, मन व धनाने सभेबरोबर आहोत. अधिवेशनात जैन समाजाची हाएस्ट उपस्थिती राहण्यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन द्याल ती जबाबदारी पार पाडू असे सांगितले.
माजी महापौर सुरेश पाटील यांनी अधिवेशन मंडप गर्दीने खचाखच भरले पाहिजे, दोन्ही राज्यात जैन समाजाला अल्पसंख्याकाचे लाभ मिळण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे. शिक्षण, शेती, उद्योग या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.असे सांगितले.
माजी आमदार वीरकुमार पाटील यांनी जैन संस्थांच्या बसेस मधून लोकांना उपस्थित ठेवू, लाखोंच्या संख्येने समाज उपस्थित ठेवण्याचे रावसाहेब दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबध्द आहोत. बेळगाव, विजापूर व लगतच्या जिल्ह्य़ातील तालुकानिहाय बैठकांमध्ये निधी व उपस्थिती बाबत प्रबोधन करणार असे सांगितले.
विनोद दोडण्णावर म्हणाले, '' लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, भरतेश विद्यापीठ आणि द. भा. जैन सभेमुळे शैक्षणिक क्रांती झाली आहे. या संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. कर्नाटकातही असे भव्य अधिवेशन झाले पाहिजे.सांगली अधिवेशनात लाखोचा जनसमुदाय सहज जमवता येईल. ''
उत्तम पाटील म्हणाले, '' अधिवेशनासाठी अरिहंत परिवाराचे संपूर्ण सहकार्य राहील. रावसाहेब दादांच्या नेतृत्वाखाली सभेचे कामकाज चांगले आहे ते अधिक चांगले करु.
यावेळी रावसाहेब दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उतम पाटील यांनी बेळगाव बोर्डिंगसाठी तीन लाखांच्या देणगीचा चेक सुपूर्द केला.यावेळी त्यांचे अभिष्टचिंतन करुन दीर्घायुरारोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुनील हणमन्नावर यांचा सत्कार करण्यात आला. आभार अधिवेशन समितीचे सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी मानले. सूत्रसंचालन कुंतीनाथ कलमणी यांनी केले.
यावेळी डॉ. एन.ए.मगदूम अंकली, शीतल पाटील उगार, शीतल डोंगरे गोकाक, डी. एस. सदलगे हारुगिरी, राजू नाडगौडा, डॉ. अण्णासाहेब चोपडे, ट्रस्टी अशोक जैन, उपाध्यक्ष सिध्दाण्णा नागणूर, महामंत्री बाळासाहेब पाटील, महिला महामंत्री सुजाता खोत, विजय दोडण्णावर, सुनील दोडण्णावर, स्तवनिधी कमिटीचे चेअरमन तात्यासो पाटील, सेक्रेटरी बी. ए. मगदूम, कुंतीनाथ कलमणी, उद्योजक सचिन पाटील, बोर्डिंग चेअरमन पुष्पक हनमण्णावर, सेक्रेटरी सन्मती कस्तुरे व बेळगावी, गोकाक, हुक्केरी, हलगा, अनगोळ, बस्तवाड, कित्तूर, बैलहोंगल, खानापूर या भागातील जैन समाज व सभेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.