कर्मवीर पतसंस्थेस आर्थिक वर्षात २० कोटी २७ लाख नफा
सांगली : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सांगलीस आर्थिक वर्ष २०२२ मध्ये २ कोटी २० लाखाचा ढोबळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे
चेअरमन श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी दिली. संस्थेच्या मार्च २०२२ अखेर प्रगती दर्शक आकडेवारीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संस्थेच्या नियोजनबध्द कामकाजामुळे संस्था चौफेर प्रगती करीत असल्याचे त्यांनी आकडेवारीनिशी सांगितले, संस्थेला संपलेल्या आर्थिक वर्षात २ कोटी २७ लाख इतका दोबळ नफा झाला आहे. संस्थेचे वसूल भागभांडवल २४ कोटी २० लाख आहे. संस्थेचा स्वनिधी ५९ कोटी आहे. आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीमध्ये १.२ कोटीची भरघोष वाढ होचन संस्थेच्या ठेवी रु ६५८ कोटीहून अधिक झाल्या आहेत. संस्थेने ४८७ कोटी चे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक २१९ कोटी ६६ लाख आहे. संस्थेचे खेळते भांडवल ७६४ कोटी असून संस्थेचा एकूण व्यवसाय १२४६ कोटी आहे. संस्थेच्या ढोबळ नफ्यातून रु. १२ कोटी २२ लाखाच्या भरघोस तरतुद केल्यामुळे संस्थेचे स्थैर्य भक्कम झाले असून संस्थेला रु.८ कोटी ५ लाखाचा निव्वळ नफा झाला आहे. संस्थेने सामाजिक जाणिव ठेवून सामाजिक कार्यासाठी देखील नफ्यातून चांगली तरतुद केली आहे.
सभासदांच्या विश्वासावर संस्था भविष्यात याहून ही मोठा टप्पा पार करेल असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला. संस्थेच्या मुख्यालयाचे बांधकाम अंतिम टप्यात असून या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन १५ मे २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व १० हुन अधिक मंत्री मदोदयांचे उपस्थित संपन्न होणार असल्याची माहिती चेअरमन यांनी दिली
चेअरमन रावसाहेब पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे उत्तम नियोजनामूळे संस्था चांगली प्रगती करीत असल्याचे मत संचालकांनी व्यक्त केले. तसेच सर्व सेवकांनी संस्थेसाठी सांधिक योगदान दिल्यामुळे त्यांचे ही अभिनंदन केले.
यावेळी संस्थेच्या व्हा. चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, संचालक अॅड. एस. पी. मगदुम डॉ. रमेश वसंतराव नू डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, अं.के. चौमुले (नाना) वसंतराव मूळाप्पाण्णा नवले. श्री लालासी भाऊसो थोटे, सौ. ललिता अशोक सकळे, डॉ. एस. बी. पाटील ( मोटके) मुख्य अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम यांचे सह संस्थेचे अधिकारी हजर होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.