प्रा. डॉ. एफ. एस. पठाण यांच्या ग्रंथाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन
औरंगाबाद. मिलिंद कला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. एफ. एस. पठाण यांच्या ग्रंथाचे नुकतेच खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. तापडिया-कासलीवाल मैदानात मुप्टाच्या रौप्य महोत्सवी झालेल्या अधिवेशनात "राष्ट्रवादी काँग्रेस: महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय समीकरणामध्ये भूमिका" या ग्रंथाचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आ. सतीश चव्हाण आ. विक्रम काळे, माजी आमदार अमरसिंह पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. एफ. एस. पठाण हे
नवखंडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य दिवंगत एस. व्ही. पठाण यांचे चिरंजीव आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.