Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेतून कडेगांव,पलुस साठी १९ कोटी ६८ लाख निधी मंजूर.राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम

मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेतून कडेगांव,पलुस साठी १९ कोटी ६८ लाख निधी मंजूर.राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम 


मुंबई दि.०२ : कडेगांव ,पलुस मधील ५१ गावातील ८२ कि.मी पाणंद रस्त्याच्या कामासाठी  राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत पाणंद रस्ते योजनेअंतर्गत ( २०२२ -२३)  या आर्थिक वर्षासाठी रू १९ कोटी ६८ लाख येवढ्या निधीला मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्याचे सहकार ,कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिली.

  गाव खेड्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात  जाण्या- येण्यासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असुन शेत मालवाहतूक  सुलभ होण्यासाठी पाणंद रस्ते पक्के व्हावेत. त्यासाठी पलूस व कडेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासून राज्यमंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या कडे निवेदनाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी या विषयांची मागणी केली होती.

ही मागणी विचारात घेऊन डॉ विश्वजीत कदम यांनी संबंधित विभागाला पत्र व्यवहार याचबरोबर त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता.

यास आज अखेर यश मिळाले असून कडेगांव मधील ५१ गावातील ८२ कि.मी पाणंद रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे.याचबरोबर पलूस तालुक्यातील २८ गावातील ५० किलोमीटर व कडेगांव तालुक्यातील २३ गावातील ३२ किलोमीटर असे एकूण ५१ गावातील  एकूण ८२ किलोमीटर लांबीच्या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. असे मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले. उर्वरित गावातील पाणंद रस्त्याच्या कामांनाही  मंजुरी मिळेल. असे त्यांनी सांगितले.

यामध्ये  पलूस मधील अंकलखोप, आंधळी, आमणापूर, कुंडल, खंडोबाचीवाडी, खटाव, चोपडेवाडी, दह्यारी, दुधोंडी, धनगाव , नागठाणे, नागराळे, पुणदी, बांबवडे, बुरुंगवाडी, बुर्ली, ब्रम्हनाळ, भिलवडी, भिलवडी- स्टेशन, मोराळे, रामानंदनगर, वसगडे, विठ्ठलवाडी, संतगांव, सांडगेवाडी, सावंतपूर, सुखवाडी व सूर्यगांव आदी गावांचा समावेश आहे.तसेच कडेगांव मधीलआमरापूर, आंबेगाव, आसद, कान्हरवाडी, कोतीज, खेराडे - वांगी, खेराडे - विटा, चिंचणी, ढाणेवाडी, तुपेवाडी, तोंडोली, नेवरी, पाडळी, भिकवडी, मोहितेवडगाव, येतगाव, वडियेरायबाग, शिरसगाव, सोनकिरे, सोनसळ, हणमंतवडीये व हिंगणगांव आदी गावातील पाणंद रस्त्यांचा समावेश आहे. सदर गावांमध्ये शेताला जाणाऱ्या रस्त्यचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लागल्यामुळे पावसाळ्यात तसेच ऊस वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांची गैरसोय मिटणार असून कडेगांव, पलुस मधील गाव -खेड्यातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.