अलिबाग, मुंबईतली संपत्ती जप्त, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, तर भाजपला संपत्ती दान करतो
नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत यांची आलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009मधील ही प्रॉपर्टी आहे. इतक्या वर्षानंतर ईडीला त्यात आता मनी लॉन्ड्रिंग दिसत आहे. या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच राजकीय सूड आणि बदल्यासाठीच हा प्रकार सुरू आहे. कोणत्या थराला हे लोक जातात हे तुम्ही पाहात आहात, असं सांगतानाच कारवाई झाली. ठिक आहे. आनंद आहे. असंच करत राहिलं पाहिजे. त्यातून आम्हाला लढण्याची प्रेरणा मिळते, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांची आलिबाग येथील जमीन आणि मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या कारवाई नंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली आहे. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. मुंबईतली संपत्ती जप्त, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, तर भाजपला संपत्ती दान करतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.