Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इम्पोटेर्ड स्कॅचचे बॅक्स सदुनिने पळवले

इम्पोटेर्ड स्कॅचचे बॅक्स सदुनिने पळवले




या बॅक्सबाबतही चौकशी होण्याची गरज, या बॅक्सच्या विक्रीतून मिळवली मोठी माया 

सांगली : इस्लामपूर येथील गोवा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या त्या सदुनिने त्या कंटेनरमध्ये असलेले इम्पेटोरड बॅक्स त्या सदुनिने पळवल्याची जोरदार चर्चा  आहे. ते बॅक्स वगळूनच त्याने कारवाई दाखवल्याचीही चर्चा आहे. त्या सदुनिने नेलेल्या या बॅक्सबाबत सखोल चौकशी हेण्याची गरज आहे. दरम्यान प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून त्या सदुनिने ते इम्पोटेर्ड दारूचे बॅक्सची विक्री करून त्यातूनही मोठी माया गोळा केल्याची चर्चा आहे. दरम्यान त्या सदुनिला वाचवण्यासाठी वरीष्ठ पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.  

ट्रॅक्टरमध्ये उतरलेले बॅक्स कंटेनरमध्ये भरताना त्यात असणारे इम्पोर्टेड दारूचे बॅक्स या सदुनिने त्याच्या अंबर दिवा लावलेल्या स्कॅपिर्ओमध्ये काढून ठेवल्याचे प्रत्यक्षदशीर्चे म्हणणे आहे. त्याने ते घेतेलेले इम्पोटर्ड बॅक्स अवाच्या सव्वा किमतीने विकल्याची जोरदार चर्चा आहे. त्या पैशातूनच त्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. शिवाय यातील काही इम्पोटर्र्ड बॅक्समधील काही बाटल्या इस्लामपूर येथील प्रसार माध्यमातील लोकांना देऊन बातम्या न देण्यासाठी आमिष दिल्याचेही बोलले जात आहे. 

दरम्यान यातील एक संशयित तक्रार करण्याच्या तयारीत असल्याचे समजल्यानंतर त्या सदुनिने पळापळ सुरू केली आहे. शिवाय हरकाम्या म्हणून काम करत असल्याने सांगलीतील वरीष्ठ अधिकारी त्याला वाचवण्यासाठी प्रय़त्नशील असल्याची चर्चा ही एक्साईजमध्ये सुरू आहे. 

इस्लामपूर येथील गोवा बनावटीच्या दारूच्या प्रकरणाबाबत सांगली दपर्ण ने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर या बातम्या न छापण्यासाठी अनेकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्या सदुनिच्या वडिलांनाही सांगली दपर्ण शी संपर्क करून विविध आमिषे दाखवून बातम्या दडपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या प्रकरणात सत्यता असल्याचेच सिद्ध होते. याबाबतचे सर्व पुरावे सांगली दपर्णकडे उपलब्ध आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.