Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महानगरपालिकेच्या बदली/मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता विमा कवच –युनियन बँक ऑफ इंडियाचा पुढाकार : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती

महानगरपालिकेच्या बदली/मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता विमा कवच –युनियन बँक ऑफ इंडियाचा पुढाकार : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती


सांगली: महानगरपालिकेच्या बदली/मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आता विमा कवच मिळणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू/नैसर्गिक मृत्यू आदींच्या बाबतीत सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने वेतन बँक असणाऱ्या युनियन बँक ऑफ इंडियाशी समन्वयाने आता महानगरपालिकेच्या बदली / मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

   याबाबत आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी, मानधन बदली कामगारांना विमा कवच देण्याबाबत अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत वार्षिक हप्ता १२ रु.  असून अपघाती मृत्यूनंतर वारसांना मिळणारी रक्कम २ लक्ष रु. आहे. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनाअंतर्गत वार्षिक हप्ता ३३० रु. असून अपघाती/नैसर्गिक मृत्यूनंतर वारसांना मिळणारी रक्कम २ लक्ष रु. आहे. युनियन बँक ऑफ इंडिया अपघाती विमा योजनाअंतर्गत वार्षिक हप्ता ३०६.१० रु. असून अपघाती मृत्यूनंतर वारसांना मिळणारी रक्कम ३० लक्ष रु. इतकी आहे. याप्रकारचे विमा कवच कर्मचाऱ्यांना व त्यांच्या अवलंबितांना प्रदान केले जाणार आहे असल्याचेही आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.