Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुद्रांक शुल्काच्या शास्तीच्या रक्कमेवरील सुटीचा नागरिकांनी लाभ घ्यावा - मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव

मुद्रांक शुल्काच्या शास्तीच्या रक्कमेवरील सुटीचा नागरिकांनी लाभ घ्यावा  - मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव


सांगली दि. 26 : मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावरील शास्तीची कपात करण्याकरिता मुद्रांक शुल्क आकारण्यायोग्य आहे अशा संलेखाच्या बाबतीत महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध कलमातील तरतुदीनुसार मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणामधील दिनांक 31 मार्च 2022 पूर्वी नोटीस मिळाली आहे, अशा प्रकरणावरील देय असणारी शास्तीच्या रक्कमेवर सुट देण्यात आली आहे. या संधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 व मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे.  

शास्तीच्या रक्कमेवर सुट देण्यात आलेल्या अर्जाचा कालावधी व देय असलेली शास्तीची रक्कम पुढीलप्रमाणे. दिनांक 1 एप्रिल 2022 ते  31 जुलै 2022 या कालावधीमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जासाठी एकूण देय असलेल्या शास्तीच्या 10 टक्के शास्तीची रक्कम देय असेल तर दिनांक 1 ऑगस्ट 2022 ते  30 नोव्हेंबर 2022 या कालावधीमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्जासाठी एकूण देय असलेल्या शास्तीच्या 50 टक्के शास्तीची रक्कम देय असणार आहे. याप्रमाणे देय होणारी शास्तीची सुट ही संबंधित प्रकरणातील मूळ मुद्रांक शुल्काची रक्कम शासनास संपूर्णपणे प्रदान केल्यानतंरच देण्यात येणार आहे. तसेच दि. 30 नोव्हेंबर 2022 नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जास सरदची सवलत देय होणार नाही. शास्तीच्या कपातीसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयास अर्ज दाखल केलेल्या दिनांकापूर्वी शासनास जमा केलेल्या दिनांकापूर्वी शासनास जमा केलेल्या शास्तीच्या रक्कमेचा कोणताही परतावा देण्यात येणार नाही, असे मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी स्पष्ट केले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.