किर्तनकार महिला आणि पुरुषाचे ' नको ते उद्योग ' ! व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर महिलेचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न तर पुरुषावर कारवाईची मागणी !
औरंगाबाद : समाजाला आपल्या किर्तनाच्या माध्यमातून उपदेश करणाऱ्या किर्तनकारांचे स्वत:चे जगणेही त्या उपदेशांप्रमाणेच असावे अशी जनतेची अपेक्षा असते. परंतू ‘ लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडा पाषाण ‘ अशी स्थिती अनेकदा असते. लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा घेणारे अनेक भोंदू स्वत: मात्र अनेक अनैतिक कृत्य करताना दिसतात.
औरंगाबाद येथे उघड झालेल्या अशाच एका घटनेने साऱ्या महाराष्ट्रात खळबळ माजवली आहे. एका प्रसिद्ध किर्तनकाराचा एक अश्लिल व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतो आहे. यातील आणखी खेदाची बाब म्हणजे या व्हिडिओत या किर्तनकारासोबत असणारी महिलादेखील किर्तनकार आहे. या प्रकारातील ४८ वर्षाचे पुरुष किर्तनकार वैजापूर तालुक्यातील आहेत तर ४० वर्षाच्या महिला किर्तनकार सिल्लोड तालुक्यातील आहेत. एका हॉटेलमधील रुममध्ये करत असलेल्या ‘ उद्योगा ‘ चा हा व्हिडिओ आहे. ३ मिनिटांचा हा व्हिडिओ हे किर्तनकार महाराज स्वत:च बनवत असल्याचेही या क्लिपमध्ये स्पष्ट होत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून हा व्हिडिओ औरंगाबाद जिल्ह्यात प्रचंड व्हायरल झाला आहे. यातील महिलेची होत असलेली बदनामी सहन न झाल्याने तिने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुरुष किर्तनकारही अत्यंत तणावाखाली आहेत. त्यांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी त्यांच्यावर त्यांचे नातेवाईक लक्ष ठेऊन आहेत. दुसरीकडे या भोंदू महाराजाला अटक करावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सेनेचे सिल्लेगाव पोलिसात निवेदन दिले आहे. या किर्तनकारांचे हजारो अनुयायी असून त्यांच्या या कृत्यांमुळे सर्वसामान्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.