शाळकरी मुलांच्या पाण्याची बाटली घेऊन जात होती महिला; हाती लागले घबाड!
मुंबई, 09 एप्रिल : कोरोनाचे सर्व निर्बंध उठले आणि गेली 2 वर्षे बंद झालेल्या शाळा उन्हाळी सुट्टीत देखील सुरुच ठेवण्यात आल्या. याचाच फायदा घेत अंमली पदार्थ तस्करांनी एक नामी शक्कल लढवली आहे.
चक्क विद्यार्थ्यांच्या शालेय वस्तूंचा वापर करत अंमली पदार्थांची तस्करी सुरु केली, विद्यार्थ्यांच्या पाण्याच्या बाटलीमधून 5 कोटींच्या ड्रग्सची तस्करारीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मानखुर्द परिसरात मुंबई गुन्हे शाखा क्रमांक ३ चे पोलीस निरीक्षक निसर्ग आतारी, सोनाली भारते, प्रकाश लिंगे आणि त्यांचे पथक अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या विशेष मोहिमेवर होते. यावेळेस लल्लूभाई कम्पाउंड येथे सकाळी ९ च्या सुमारास एक एक महिला एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीसोबत जात होती आणि तिच्याकडे दोन वाॅटर बॉटल होत्या. ज्या विद्यार्थ्यांच्या शालेय वापरा करिता होत्या.
पोलिसांना संशय आल्याने या महिलेला आणि त्या वृद्ध व्यक्तीची चौकशी सुरू केली. मात्र प्राथमिक तपासात त्यांच्याकडे काहीच आढळले नाही. शेवटी तिथून जाण्याचा पोलिसांनी निर्णय घेतला पण एका पोलिसाचे महिलेकडे असलेल्या पाण्याची बाटलीकडे लक्ष गेले आणि ती महिला बॉटल लपवत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तिझ्या जवळील पाण्याची बॉटल ताब्यात घेतली आणि त्या बॉटलची नीट तपासल्या असता त्या बॉटल वरच्या बाजूने चिकटवल्याचे पोलीस निरीक्षक सोनाली भारतीय यांना काही तरी दिसले. तो चिकटवलेला भाग काढला असता बॉटलच्या आत विशिष्ट प्रकारची पोकळी आढळून आली.
आता पोलिसांचा या महिलेवरील संशय बळावला आणि त्यांनी ती बॉटल खोलली तेव्हा पोलिसांचे डोळे ही पांढरे झाले. कारण त्या बॉटलमध्ये पोकळीत त्या महिलेने अंमली पदार्थ लपवले होते ज्याचे वजन 1 किलो 935 ग्रॅम होते. धक्कादायक म्हणजे हा १ किलो ९३५ ग्रॅम अंमली पदार्थ म्हणजे उच्च प्रतिचे हेरॉईन हे अंमली पदार्थ होते.
ज्याची बाजारात किंमत तब्बल ५ कोटी ८० लाख ५० हजार रुपये आहे. पोलीस निरीक्षक निसर्ग आतारी, सोनाली भारते, प्रकाश लिंगे आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने महिलेसह ६५ वर्षांच्या वृद्धाला ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली असता ते हे अंमली पदार्थाची डिलेव्हरी द्यायला जात होते. पण त्याआधी त्यांना पोलिसांनी अटक केली. हे अंमली पदार्थ या महिलेने कुठून आणले?
आणि हे अंमली पदार्थ ही महिला कोणाला द्यायला जाणार होती? याची माहिती पोलीस घेत आहे पण इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याने एकच खळबळ उडाली असून यामागे नेमके मास्टरमाईंड कोण आहेत? याचा शोध आता पोलिस घेत आहे.रम्यान, या प्रकारानंतर मुंबई क्राईम ब्रांचने मुंबई अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम आणखी तीव्र केली असून येत्या दिवसात मुंबईतील अनेक अंमली पदार्थ तस्कर गजाआड असतील असा विश्वास वरीष्ठ पोलिसांनी व्यक्त केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.