सांगलीचे कंट्रोल रूम विट्यामध्ये बदल्यांसाठी ठराविक अधिकाऱ्यांचे लॉबिंग सुरू, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
सांगली विशेष प्रतिनिधी: सध्या मार्च संपल्यानंतर अधिकाऱ्यांना बदल्यांचे वेध लागले आहेत. मात्र जिल्ह्यातील दलाचे कंट्रोल रूम सांगलीतून विट्यात हलवल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. विटा, कडेगाव, तासगाव, जत, आटपाडीतील प्रभारी अधिकाऱ्यांनी लॉबिंग केल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांत अस्वस्थता आहे. जिल्ह्याचे प्रति प्रमुख अशी ओळख असलेल्या पदासाठी या लोकांनी फिल्डींग लावली आहे.
शिवाय या लोकांनी अन्य ठिकाणच्या प्रभारी पदासाठी फिल्डींग लावली आहे. शिवाय या लॉबीत सामील असलेल्यांचे छुपे कारनामे ज्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे. अशा कर्मचाऱ्यांची चांगलीच भट्टी लावण्यासाठीही या लॉबीतील अधिकायांनी फिल्डींग लावली आहे. लॉबिंग करून जिल्ह्याचे प्रमुख आणि पर्यायाने जिल्ह्यावर पकड ठेवण्यासाठीही यांची तयारी सुरू आहे. त्यामुळे अनेक वरीष्ठ अधिकारी नाराज आहेत.
कार्यकाल चांगला ठरूनही अन्याय झाल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे. अनेक वरीष्ठ अधिकारी या लॉबीमुळे साईड पोस्टींगला काम करत आहेत. त्यात ज्यांना आता पोस्टींग मिळाली आहे. त्या अधिकाऱ्यांना हटवण्यासाठी ही लॉबी कायर्रत झाली आहे. शिवाय लॉबीतील अधिकाऱ्यांच्या आतल्या बाबी माहिती असणाऱ्या कर्मर्चाऱ्यांचीही विशिष्ठ ठिकाणी बदली करण्यासाठीही तयारी सुरू आहे. लॉबीतील अधिकाऱ्यांना ज्या कर्मचाऱ्यांनी मदत केली त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी हे अधिकारी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून भविष्यात त्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड झाल्यास नवल वाटणार नाही. एकंदरीत ही खदखद लवकरच बाहेर पडणार असून जिल्ह्यात तसेच दलात यामुळे मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.