उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, दि. 28, : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत रविवार दि. 1 मे 2022 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 1 मे रोजी दुपारी 12 वाजता वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग येथून मोटारीने सांगली कडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता माधवनगर रोड, सर्किट हाऊस सांगली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5 वाजता शिवसेना सांगली जिल्हा पदाधिकारी आढावा बैठक, स्थळ - माधवनगर रोड, सर्किट हाऊस सांगली. सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त भव्य कामगार मेळाव्यास उपस्थिती, स्थळ - चाणक्य चौक, भारत सुत गिरणी रोड, कुपवाड, सांगली. सायंकाळी 7.45 वाजता शिवसेना मिरज तालुका प्रमुख विशालसिंग रजपूत यांच्या संपर्क कार्यालय उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - मिरज. रात्री 8 वाजता शिवतिर्थ भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती, स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज चौक मिरज. रात्री 9.20 वाजता मिरज रेल्वे स्थानक कडे प्रयाण. रात्री 9.45 वाजता मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.