Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली: टेम्पोचालकाचा मुलगा राज्यसेवेत पहिला

 सांगली: टेम्पोचालकाचा मुलगा राज्यसेवेत पहिला


सांगली: राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. (MPSC 2022) या परीक्षेत सोनी (ता. मिरज) येथील प्रमोद बाळासाहेब चौगुले याने राज्यात पहिला क्रमांक मिळवत सांगली जिल्ह्याच्‍या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्रमोदला ६०० प्लस गुण मिळाले. राज्यात तिसरी आणि महिलांमध्ये पहिला येण्याचा मान रूपाली गणपत माने हिने (५८०.२५ गुण) मिळविला.सोनी येथील प्रमोद चौगुलेचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. पाचवीला त्याची निवड पलूस येथील नवोदय विद्यालयात झाली. तिथून त्याचे शिक्षण कराडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन जीवनातच स्पर्धा परीक्षेचा संकल्प केला होता. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी कठोर परिश्रम घेतले.

केंद्रीय लोकसेवा (UPSC) आयोगाच्या परीक्षेत प्रमोद चौगुले याने यश मिळण्यासाठी दीर्घकाळ कठोर परिश्रम केले. मात्र, मुख्य परीक्षेपर्यंत धडक मारूनही थोडक्यात संधी हुकली. अभियांत्रिकी शिक्षणानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा निरंतर अभ्यास सुरूच ठेवला होता. मुख्य परीक्षेत चांगले गुण मिळाल्याने त्याला अपेक्षित होते. त्याची भरपाई करताना राज्य लोकसेवा ग्रुप परीक्षेत त्याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या खाजगी क्लासेसमध्ये अध्यापन करून त्याने हे यश प्राप्त केले आहे.

कोरोना काळात सांगलीत पूर आला होता. तेव्हा प्रमोद चौगुले यांच्या घरात सगळे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. प्रमोद एकटा अभ्यास करत होता. अशा बिकट परिस्थितीत मार्ग काढून त्यांनी हे यश मिळवले आहे. या प्रवासात अनेकदा त्यांना सगळं सोडून द्यावेसे वाटले. मात्र त्यांनी हिंमत सोडली नाही. घरच्यांनी त्यांनी खूप पाठिंबा दिला. वडील बाळासाहेब टेम्पोचालक तराई घरी शिवणकाम करते. कष्टकरी शेतकरी कुटुंबाची पासून असलेल्या चौगुले यांनी सोनी गावचा लौकिक वाढवला आहे. बाळासाहेब यांनी सकाळची बोलताना मुलाने यशामुळे आयुष्याचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.