मे पासून टीचर ऑफ द मंथ पुरस्कारही दिला जाणार
महापालिका शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी विशेष उपक्रम हाती ; खासगी शाळांच्याप्रमाणे सर्व कोर्सेस सुरु होणार: मनपा शाळेत आदर्श कम्प्युटर लॅब, स्कुल रँकिंग स्पर्धा, इंटरनेट सेवा पुरवल्या जाणार: मनपा शाळांचे smkc मॉडेल निर्माण केले जाणार : मे पासून टीचर ऑफ द मंथ पुरस्कारही दिला जाणार: आयुक्त नितीन कापडणीस यांची आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात घोषणा
मिरज: महापालिका शाळांच्या पटसंख्या वाढीसाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात येत असून खासगी शाळांच्याप्रमाणे सर्व शैक्षणिक क्रीडा कोर्सेस महापालिका शाळांमध्ये सुरु करण्याची घोषणा मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी केली. याचाच एक भाग म्हणून मे महिन्यापासून मनपा शिक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी टीचर ऑफ द मंथ पुरस्कारही दिला जाणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने मिरज बालगंधर्व नाट्यगृहात आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमात आयुक्त कापडणीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दिग्विजय सुर्यवंशी होते. कार्यक्रमाची सुरवात महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रवादीचे गटनेते मैनुदिन बागवान, माजी महापौर संगीता खोत, समाजकल्याण सभापती सुबराव मद्रासी, महिला बालकल्याण सभापती गीतांजली ढोपे पाटील, प्रभाग 4 च्या सभापती गायत्री कल्लोळी, नगरसेवक विष्णू माने, नासीमा शेख, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, शिक्षणाधिकारी पोपट मलगुंडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिका प्रशासनाने शिक्षणावर अधिक भर दिला आहे. यासाठी अर्थसंकल्पात 5 कोटींची तरतूद केली . त्यामुळे यापुढच्या काळात महापालिका शाळांचा शिक्षणाचा दर्जा आणि स्तर आणखीन उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
खासगी शाळांच्याप्रमाणे सर्व कोर्सेस सुरु होणार: मनपा शाळेत आदर्श कम्प्युटर लॅब, स्कुल रँकिंग स्पर्धा, इंटरनेट सेवा पुरवल्या जाणार: मनपा शाळांचे smkc मॉडेल निर्माण केले जाणार मे पासून टीचर ऑफ द मंथ पुरस्कारही देण्यात येणार आहे. महापालिका शाळांना गणवेश आणि बूट सुद्धा महापालिका प्रशासन देणार आहे. महापालिका शाळांची गुणवत्ता आणखीन वाढवण्यासाठी पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकानी काम करावं. महापालिका शाळांच्या शिक्षणाची कमतरता भरून
काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असेही आयुक्त कापडणीस यांनी सांगितले. स्वागत प्रास्ताविक पोपट मलगुंडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण मंडळाचे लेखापाल गजानन बुचडे, सहायक कार्यक्रम अधिकारी सतीश कांबळे, तात्यासाहेब सौन्दते, कनिष्ठ अभियंता मंदार कारंडे आणि सर्व केंद्र समन्वयक आणि अन्य स्टाफकडून करण्यात आले. सूत्रसंचालन राकेश कांबळे, वनिता व्हनखंडे, सायराबानू चौधरी यांनी केले. यानंतर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये प्लास्टिक हटाव, माझी वसुंधरा, पर्यावरण रक्षण, बेटी बचाव, राष्ट्रीय एकात्मक याबरोबर अनेक सामाजिक संदेश देणारी गीते आणि समूव्ह गीते सादर करण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दीपक चव्हाण, सोनाली केंकडे आणि राम नाईक यांच्या टीमने देशभक्तीपर गाणी सादर केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.