Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आजपासून सीएनजी स्वस्त.

 आजपासून सीएनजी स्वस्त.


पुणे : सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या दरावर (सीएनजी) आकारला जाणारा कर (व्हॅट) 10 टक्‍क्‍यांनी घटविल्याने पुण्यात सीएनजी सहा रुपये तीस पैसे आणि पाइप नॅचरल गॅस (पीएनजी) 3.40 रुपयाने स्वस्त झाला आहे.

पुण्यात 31 मार्च रोजी एक किलो सीएनजीचा दर 68.50 रुपये आणि घरगुती वापराचा गॅस (पीएनजी) 37.10 रुपये किलो होता. आता सीएनजी 62.20 रुपये आणि पीएनजी 33.70 रुपये दर असेल. नवीन दरांची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून केली जाणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने सीएनजीवरील कर घटविला असला तरीही 'एमएनजीएल'ने 31 मार्च रोजी सीएनजीमध्ये अडीच रुपये आणि पीएनजीमध्ये 1.10 रुपये दरवाढ केली आहे. अन्यथा सीएनजीचा दर साठ रुपयांखाली गेला असता.

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे दर गगणाला भिडल्याने वाहन चालकांचे आर्थिक गणित कोलमडले होते. मात्र, आता सीएनजीचे दर घटणार असल्याने संबंधित वाहन मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवर आकारल्या जाणाऱ्या व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिक वायूचा कर 13.5 टक्‍क्‍यांवरून 3.5 टक्‍के इतका केला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, तळेगाव आणि हिंजवडी या लगतच्या भागांत महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा केला जातो. सध्या, एमएनजीएलचे सीएनजी पंप असून, साडेतीन लाख रुपयांहून अधिक घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पीएनजी पुरवला जातो. त्यामुळे लाखो ग्राहकांसह वाहनचालकांना आता दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पुण्यात जानेवारी 2018 ते मार्च 2022 या कालावधीत सीएनजी सुमारे 20 रुपयांनी महागला आहे. एक जानेवारी 2018 रोजी सीएनजीचा दर 47.50 रुपये होता. तो दर 31 मार्चला आता 68.50 रुपयांवर गेला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.