केंद्रीय जीएसटीच्या अधीक्षकांसह निरीक्षकास ५० हजारांची लाच घेताना अटक जयसिंगपूर येथील कायार्लयाबाहेर सीबीआयच्या पथकाची कारवाई
सांगली: कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याकडून पन्नास हजारांची लाच घेताना केंद्रीय जीएसटीचे अधीक्षक नेसरीकर, निरीक्षक मिश्रा यांना शुक्रवारी सकाळी रंगेहात पकडण्यात आले. जयसिंगपूर येथील जीएसटी कायार्लयाबाहेर सीबीआयच्या पथकाने ही कारवाई केल्याचे समजते. दरम्यान लाच घेताना सीबीआयच्या पथकाने पकडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याकडून पन्नास हजारांची लाच मागितली होती. याबाबत संबंधित व्यापाऱ्याने सीबीआयकडे तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी सकाळी दोन्ही अधिकाऱ्यांना पन्नास हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दुपारी त्या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.